स्टार प्रवाह वरील, सुख म्हणजे नक्की काय असत ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला या मालिकेने एक वेगळी ओळख दिली.जयदीप आणि गौरीच्या जोडीसोबत शालिनी आणि देवकी ही दोन जावांची जोडी देखील चांगलीच चर्चेत असते. (Girija Prabhu Viral Dance)
सध्या मालिकेतील देवकी हे पात्र बदल आहे. जुनी देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड. मॅड हेड म्हणून घरोघरी पोहचली.गेल्याच वर्षी मीनाक्षी आणि कैलाशला कन्या रत्न झाले. गरोदरपणातही मीनाक्षी मालिका करत होती म्हणून तिचे फार कौतुक झाले. शेवटच्या काही दिवसात मीनाक्षीला मालिका सोडावी लागली. यारा च्या जन्मानंतर मीनाक्षी आणि कैलाश तिचे बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. यारा ची प्रत्येक खास गोष्ट त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवत असतात.
पाहा कसा साजरा झाला याराचा पहिला वाढदिवस (Girija Prabhu Viral Dance)
११ मे २०२३ रोजी याराचा पहिला वाढदिवस साजरा झाला.तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेची पूर्ण टीम उपस्थित होती.यारा सोबत खूप चांगला वेळ सर्वांनी घालवला. या सेलिब्रेशनचे बरेच फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या फोटोजवरून त्यांनी बरीच धमाल केलेली पाहायला मिळते आहे.
या कार्यक्रमाचं अजून एक आकार्षण ठरलं ते म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभूचा डान्स. चंद्रा या गाण्यावर गिरीजा थिरकताना पाहायला मिळाली. तिच्या या डान्स व्हिडिओची तिच्या प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतो आहे. आणि प्रेक्षकांनी देखील तिच्या या डान्सला पसंती दर्शवली आहे.(Girija Prabhu Viral Dance)

हे देखील वाचा : हिंमत दाखवणं हा एकच पर्याय – असा शूट केला गौरीने सिन