रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पत्नीच्या वाढदिवशी का मिलिंद गवळी करतात दोन दोन सेलिब्रेशन्स? पोस्ट शेअर करत केला खास किस्सा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 11, 2023 | 10:42 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Milind Gawali Birthday Post :

Milind Gawali Birthday Post :

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची जशी भूमिका नेहमीचीच चर्चेत असते तशीच त्यांचे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टही नेहमीच चर्चेत असतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर अधिक लक्षणीय ठरतेय.(Milind Gawali Birthday Post)

मिलिंद यांनी त्यांची पत्नी दिपा साठी केलेल्या या खास पोस्ट मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीचं भरभरून कौतुक केलं आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंद यांनी दिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे, दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा, नेहमी सारखं सतत हसत रहा. अशी ईश्वरचरणी प्रार्थना, आम्हाला अशीच inspire करत रहा, तुझी चिकाटी, जिद्द, energy infectious आहे. अशीच रहा !

पाहा मिलिंद यांची बायकोसाठीची खास पोस्ट (Milind Gawali Birthday Post)

आणि नशीबवान आहेस तू , तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात, वर्षानुवर्ष वाढदिवस ९ नऊ मे May या तारखेला साजरा केला जातो, खरं तिचा जन्म दहा १० मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी ९ ला केला जातो, कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताईचा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा, आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं, आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे. म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. एकाच दिवशी दोघांच celebration करण्यापेक्षा दोन वेगवेगळे सेलिब्रेशनस करायला काय हरकत आहे. किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया.(Milind Gawali Birthday Post)

खूपश्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो, आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता , म्हणजे आमच्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशन साठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती, मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं , पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे,
बऱ्याचशा लोकांचा जन्म तारखे बरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे.

हे देखील वाचा – याराच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री गिरीजा प्रभू

चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं. आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते. कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले हि असतात. Double celebration करायला मिळातं. तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या Double शुभेच्छा असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Tags: aai kuthe kaay karteaai kuthe kay kartedeepa gawalientertainmentits majjamarathi actormarathi actressmarathi malikamarathi serialmilind gawalimilind gawali family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Struggle Story of Manoj Bajpayee

दिग्दर्शक, निर्मात्यांनी शिव्या दिल्या, हाकललं पण आज मानानं घेतलं जात नाव..

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.