चित्रपट, मालिका, नाटक माध्यम कोणतंही असो प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकाराला नेहमी सुंदर रूपात, सुंदर अभिनय करताना पाहण्यासाठी आतुर असतात. कलाकाराच्या प्रत्येक फोटो किंवा रील ला परीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. सध्या असाच एक लुक ट्रेंडिंग होतोय अभिनेत्री गिरीजा प्रभूचा.(Girija Prabhu New Look)
सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील गौरी म्हणजे अभिनेत्री गिरिजचा हिरव्या साडीतील एक लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे. नाकात नथ, केसात गजरा, सुंदर हास्य, हातात चुडा, गळ्यात दागिन्यांचा सुंदर साज, कपाळावर नक्षीदार चंद्रकोर असं हे गौरीचं साजरं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळतंय.
गौरीच्या या पोस्ट वर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या रूपाचं कौतुक केलं आहे. गौरीच्या चंद्रा गाण्यावरील डान्स नंतर आता गौरीचे हे फोटोज सुद्धा चांगलेच वायरल होताना दिसतायत.(Girija Prabhu New Look)
हे देखील वाचा – आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली
गिरीजा सध्या सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गौरी हे मुख्य पात्र साकारत आहे. तिच्या सोबत अभिनेता मंदार जाधव हा जयदीपच्या भूमिकेत दिसत आहे. तर मालिकेत अन्य ही तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळते. मालिकेच्या कथने सध्या टीआरपीच्या शर्यतीत सलग पाचव्यानंदा बाजी मारत पहिल्या 5 मालिकांच्या यादीत नाव मिळवलं आहे. यावरून मालिकेची असलेली लोकप्रियता लक्षात येते.