‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील भूमिकेमुळे गौतमीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या गौतमी नाटकविश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गालिब या नाटकातून ती रंगभूमीवर काम करताना दिसत आहे. अभिनयाशिवाय गौतमी चर्चेत राहिली ते म्हणजे तिच्या लग्नामुळे. कोणतीही पूर्वसूचना वा प्रेमाची जाहीर कबुली न देता गौतमीने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत लग्नाची खुशखबर दिली. गौतमीने कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधत त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar)
गौतमी व स्वानंद यांनी २५ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. गौतमी व स्वानंदच्या लग्नाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. लग्नानंतरही ही जोडी त्यांच्या संसारात रमलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर ते एकत्र बरेच रील व्हिडीओ बनवत सोशल मीडियावरून शेअर करत असतात.

अशातच स्वानंदच्या एका इंस्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वानंदने शेअर केलेल्या स्टोरीमधील फोटोमध्ये सहा वेगवेगळी घड्याळ दिसत आहे. “छोटी भेटवस्तू खूप आनंद देऊन जाते. बायको आपले छंद जोपासते तेव्हा”, असं म्हणत गौतमीचे आभार मानले आहेत. यावरून दोघांमधील प्रेम पाहायला मिळतंय. अनेकदा स्वानंद व गौतमी एकत्र फिरतनाचे अनेक फोटोही शेअर करतात. तसेच एकमेकांसाठी खास पदार्थही ते बनवतात.
दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सारे तुझ्याचसाठी’ ही गौतमीची पहिली मालिका आहे. हर्षद अतकरीबरोबर या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘माझी होशील ना’ मालिकेत पाहायला मिळाली. गौतमीची ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील गौतमी व विराजस कुलकर्णीची जोडी चांगलीच हीट झाली. तर स्वानंद तेंडुलकर हा भाडिपा या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलसाठी तो व्हाईस प्रेसिडंट म्हणून काम पाहत आहे.