Salman Khan On Aishwarya Rai Wedding : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. हे जोडपे घटस्फोट घेत असल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या राय कोणत्याही कार्यक्रमात मुलगी आराध्याबरोबर जाते, बच्चन कुटुंबाबरोबर ती दिसत नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. तथापि, या प्रकरणी जोडप्याकडून किंवा कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, सलमान खानचा एक जुना व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
ऐश्वर्या राय एकेकाळी सलमान खानसह प्रेमसंबंधात होती. २००२ मध्ये ऐश्वर्या व सलमानचे प्रेमाचे नाते संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. दोघांनीही त्यांच्या डेटिंग लाइफबद्दल कधीच उघडपणे भाष्य केले नाही. सलमान एकदा रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये दिसला होता, जेव्हा त्याने अभिषेकबरोबर ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल उघडपणे बोलले होते.
या मुलाखतीत सलमान खानला विचारण्यात आले की, “तो ऐश्वर्याबरोबर गैरवर्तन करतोय का?”. यावर अभिनेता म्हणाला, “मी काय बोलू सर? वैयक्तिक आयुष्य खासगीच राहायला हवं असं माझं मत आहे. आता मी स्वतःचा बचाव केला तर त्याचा अर्थ असा होईल की कोणीतरी माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होतं, हे मी नाकारतोय. त्यामुळे शांत राहणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे”.
आणखी वाचा – दिशा पटानीच्या वडिलांची २५ लाखांची फसवणूक, उच्च पदाचे आमिष दाखवून पैसे लुबाडले अन्…; नेमकं प्रकरण काय?
ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “आता इतकी वर्षे लोटली आहेत. ती एका छान कुटुंबात सुखी वैवाहिक आयुष्य जगतेय आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. अभिषेक खूप चांगला माणूस आहे. तुमचं एकमेकांबरोबरचं नातं संपल्यानंतर त्या व्यक्तीने दुःखी राहावं, असं कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटत नाही. आपल्याशिवाय समोरच्या व्यक्तीने आनंदी राहावं, असंच कोणत्याही एक्स बॉयफ्रेंडला वाटतं”. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सलमानची ही एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.