Bipasha Basu Daughter Had Two Holes in Heart : सामान्य माणसाप्रमाणे कलाकारांना देखील त्यांच्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अशाच एका वाईट गोष्टीचा सामना करावा लागला होता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासूला. वर्षभरापूर्वी अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करणं सिंग ग्रोव्हर यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. बिपाशा व करणंने मुलीचं ‘देवी’ असं नामकरण देखील केलं. नुकतंच बिपाशाने लेकीच्या आरोग्याबाबत एक खुलासा केला आहे. देवीच्या जन्मापासून ती एका आजाराने त्रस्त आहे त्याबद्दल माहिती बिपाशाने एका इंस्टाग्राम लाईव्ह वरून दिली आहे. (Bipasha Basu Daughter Health Issue)
बिपाशाने अभिनेत्री नेहा धुपिया सोबतच्या इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये आपल्या वैवाहिकन आयुष्याबाबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या. शेअर केलेल्या या आठवणींमध्ये एक दुःखद आठवण देखील बिपाशाने यावेळी शेअर केली. बिपाशा यावेळी मुलगी देवीच्या आरोग्याबाबत खुलासा करत म्हणाली ” जन्मापासून देवीच्या हृदयात छिद्रे आहेत या आजाराला वेंट्रिकुलर सेप्टल डिफेक्ट (VSD) असं म्हणतात. ती तीन महिन्याची होती तेव्हा आम्हाला तिच्या या आजाराबद्दल समजलं. आई वडील म्हणून आमचं तेव्हापासूनच आयुष्य खूप तणावात गेलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय न्हवता पण ३ महिन्याच्याच्या बाळाची हर्ट सर्जरी करणं मला मान्य न्हवत.(Bipasha Basu Daughter Had Two Holes in Heart)
हे देखील वाचा – “हा सिन लक्षाचा आहे, मी यात….” धुमधडाका चित्रपटातील ‘त्या’ सीन बाबत मामांनी स्पष्टचं सांगितलं
परंतु डॉक्टरांच्या म्हणनुसार दुसरा पर्याय देखील न्हवता म्हणून आम्ही दोघे कुटुंबाच्या सहमतीने बाळाच्या ऑपरेशनसाठी तयार झालो. तब्बल ६ तास देवीची ही सर्जरी चालू होती त्यावेळी आमच्यावर बेतणाऱ्या परिस्थतीचा कोणी अंदाजही लावू शकत न्हवत. देवाच्या कृपेने सर्जरी यशस्वी ठरली आणि देवा यातून पूर्णपणे बरी झाली. पुढे बिपाशा म्हणाली आमच्या या दुःखात कुटुंबासह अनेक जणांनी आम्हाला साथ दिली शिवाय देवी सुद्धा आधी पासूनच स्ट्रॉंग होती. (bipasha basu family)
करणं सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासू हे दोघेही बऱ्याच कालावधी पासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यकर्त असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेक चित्रपटांमधून त्यांनी अभिनय करून विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या दोघेही मुलगी देवी सोबत आनंदाने राहत आहेत.