हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. भूमी तिचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिने नुकतीच शेअर केलेली तिची इन्स्टाग्राम पोस्ट. (Actress Bhumi Pednekar Shared Photo On Instagram)
भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सेल्फी असलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांसाठी एक पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयीची अपडेट दिली आहे. ही पोस्ट शेयर करत तिला एका आठवड्यापूर्वी डेंग्यू झाल्याचा खुलासा केला आहे. त्याचबरोबर या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच तिच्या उपचारादरम्यान तिला मदत करणाऱ्या डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांचे तिने आभार मानले आहेत.
भूमीने या पोस्टखाली कॅप्शनमध्ये असं म्हटल आहे की, “डेंग्यूच्या एका डासाने मला ८ दिवस त्रास दिला. पण आज जेव्हा मला जाग आली तेव्हा मला जरा बरं वाटलं. त्यामुळे मी सेल्फी घेण्याचा विचार केला”. यापुढे तिने चाहत्यांना तब्येतीविषयी सल्ला देत असं म्हटलं आहे की, “तुम्ही सर्व सावध रहा. मागील काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप खराब झाली आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना डेंग्यूचा त्रास झाला आहे. या विषाणूमुळे तब्येत खराब केली आहे”. यापुढे तिने रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, स्वयंपाकघर व सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तिने आई, बहीण व मैत्रीण यांना धन्यवाद म्हणत त्यांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान भूमीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, धुपिया आदि कलाकार मित्रमैत्रिणीने “काळजी घे, लवकर बरी हो” अशा अनेक कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त करत कमेंट्सद्वारे तिला लवकर बरं होण्याविषयी व काळजी घेण्याविषयीही सांगितले आहे.