अश्विनी भावे आणि लींबू कलरची साडी हे अजरामर झालेलं समीकरण आहे.एव्हरग्रीन अभिनेत्रींनमध्ये गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. हिंदी मराठी सिनेसृष्टीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. मालिका, चित्रपट, नाटक,जाहिरात अशा सर्व माध्यमांत त्या पाहायला मिळाल्या. (Ashvini Bhave Troll)
शालेय जीवनापासून त्या हौस म्हणून कलाक्षेत्रातील स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या. त्या नंतर त्यांनी काम सुरूच ठेवलं,शाबास सुनबाई हा त्यांचा पहिला चित्रपट. त्या नंतर त्या ऑल टाइम फेव्हरेट चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात महत्वाच्या भमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आणि त्यांच्या त्या भूमिकेची छाप आज ही प्रेक्षकांच्या मनावर आहे.
पाहा काय घडलं होतं ? (Ashvini Bhave Troll)
कायमच त्यांच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळत.परंतु कोणताच कलाकार हा टिकेपासून वाचत नाही.कलाकार कितीही मुरलेला असला तरी तरी टीकेला समोर जावच लागत. असाच एक किस्सा अश्विनी भावेंनी सांगितला आहे.त्या असं म्हणाल्या इतरांच्या टीकेपेक्षा आप्तेष्टांच्या टीका जास्त असतात. राऊ या मालिकेत त्यांनी मस्तानी ची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका मिळण्याआधी. स्मिता ताईंना असं सांगण्यात आलं होतं की अश्विनी या भूमिकेसाठी शोभून नाही दिसणार.(Ashvini Bhave Troll)
स्मिता ताईंना असं सांगण्यात आलं की, हे म्हणजे अश्विनी कशी मुस्लिम वाटणार, एकदम मराठी ब्राम्हणी छाप असणारी मुलगी आहे ही.हिला काय जमणार आहे, ते कुठून तरी अश्विनींच्या कानावर आलं. आणि त्यांना असं वाटत होतं की, या भूमिकेसाठी स्मिता ताईंनी अश्विनींचा विचार करावा. तेव्हा अश्विनींनी ठरवलं की, आपण आपली तयारी करू, आणि तेव्हा जी काय साधन उपलब्ध होती त्यांचा वापर करून त्यांनी रिसर्च केला.मुस्लिम वेषाचा त्यांनी अभ्यास केला ती अदब काय असते ते त्यांनी पाहिलं.
हे देखील वाचा : ‘मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस आहे’ महेश यांनी अश्विनी भावेला दिल उत्तर
त्यानंतर त्यांनी प्रोफीड मार्केटला जाऊन तशी एक ओढणी शोधली, हैद्राबादला त्यांचं एक शूट सुरु होत तेव्हा मुस्लिम पद्धतीचे दागिने त्यांच्या कडे होते आणि या सगळ्याचा वापर करून त्यांनी एक मुस्लिम लुक तयार केला. आणि त्यांच्या एका मित्राला फोटो काढायला सांगितला कारण त्यांना स्वतःला आधी पाहायचं होतं कि त्या भूमिकेसाठी सूट होतील का? त्या नंतर त्यांनी तो फोटो स्मिता ताईंना दाखवला. आणि राऊ मधली मस्तानी सापडली. त्या नंतर या मालिकेने वेगळाच इतिहास रचला.आणि अश्विनी भावेंनी त्यांच्यावर झालेल्या टीकेचं उत्तर त्यांच्या कामातून दिलं.