‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं.या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.मालिकेतील अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या भूमिकेला देखील विशेष पसंती मिळत आहे. अनघाचा समजूतदारपणा, स्पष्टवक्तपणा या सर्व पैलूंमुळे अनघा या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी आपलस केलं.(ashvini mahangade serial)
अश्विनी मालिकेमुळे जितकी चर्चेत असते तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रकाशज्योतात असते, सध्या अश्विनी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहेत.त्याच सोबत समजाप्रती असणारी जबाबदारी देखील अश्विनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पार पडत असते.ही सर्व तारेवरची कसरत करत अश्विनी ‘मेरे साई’ ही हिंदी मालिका देखील करत होती. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानिमित्त अश्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे.
पाहा काय म्हणाली अश्विनी? (ashvini mahangade serial)
मेरे साई या तिच्या भूमिकेचे फोटो अश्विनीने शेअर केले आहेत, त्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये तिने लिहलं आहे.मेरे साई..अप्रतिम अनुभव. परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहचवून या मालिकेने समारोप केला.मी साधारण १ वर्ष या मालिकेचा भाग होते.तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका.खरे तर शब्द उच्चारायचे, पाठांतर होईल न, मला जमेल न, अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले.तेजस्वीला मी स्वीकारले आणि तिने मला.त्याच सोबत संपूर्ण टीम चे देखील तिने आभार मानले आहेत,

अश्विनी तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते, आई कुठे काय करते या मालिकेतून अनघाच्या भूमिके रोज पाहायला मिळते, स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत देखील ती महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाली होती. तर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात देखील अश्विनी झळकली.
हे देखील वाचा : मायराच्या शाळेचं काय?असा प्रश्न चाहत्यांना पडला होता -आई-वडिलांनी दिलं उत्तर