महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आज संपूर्ण देश विदेशात धुमाकूळ घातलाय. लाखोंच्या पटीत या कार्यक्रमाचे चाहते आहेत. कित्येकांच्या घरी महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहिल्याशिवाय जेवण ही जात नाही. खरं सांगायचं तर या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे. या कार्यक्रमामुळे हास्यजत्रेत काम करणाऱ्या कलाकारांना उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. मालवणी भाषेतून केलेले तिचे विनोद प्रेक्षकांना खूप आवडतात. (rasika vengurlekar new movie)
मालिकाविश्वातून रसिकाने आजवर साऱ्यांचं मनोरंजन केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून रसिकाने मालिकाविश्वात आपलं नाव कमावलं, मात्र रसिकाला खरी लोकप्रियता मिळाली ती महारष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून. आता रसिका वेंगुर्लेकरची पावले छोट्या पडद्यावरून मोठया पडद्याकडे जाताना दिसत आहेत. लवकरच रसिका मोठा पडदा गाजवायला सज्ज होताना दिसणार आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त सोहळा संपन्न झाला.
पाहा रसिकाच्या नव्या चित्रपटाची झलक (rasika vengurlekar new movie)
प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव या चित्रपटात रसिका वेंगुर्लेकरला पाहणं रंजक ठरतंय. रसिका सोबत या चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून रसिकाची एक वेगळी भूमिका मोठ्या पडद्यावर अनुभवणं रंजक ठरणार आहे.(rasika vengurlekar new movie)
हे देखील वाचा – मालिकेने घेतला निरोप -अभिनेत्री अश्विनी महांगडेने केला खुलासा
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो असल्याने यात अर्थात रसिकाचा कॉमेडी अंदाज नेहमीच प्रेक्षकांना भावतो आता वडापाव या चित्रपटातून रसिका कॉमेडी अंदाजात दिसणार की आणखी कोणत्या वेगळ्या भूमिकेतून दिसणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.