काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत आले आहेत. काही कुटुंबांमध्ये हे कार्यक्रम पाहिल्याशिवाय जेवण जात नाही, तर काहींना मानसिक तणावणातून रिलीफ मिळावी म्हणून सुद्धा या कार्यक्रमांची मदत होते. याच कार्यक्रमांच्या यादितील एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा घरोघरी एखादा सदस्य असावा असा राहत असलेला कार्यक्रम. कोरोना काळात घरात अडकलेल्या जनतेसाठी एका प्रकारचा बुस्टर डोस प्रमाणे हास्यजत्रेने कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं.(Ashvini Bhave in MHJ)
सध्या रुपेरी पडद्यावर अनेक नवीन चित्रपट पाहायला मिळतात. यातील अनेक कलाकार प्रमोशन निम्मित महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या मंचावर आलेले पाहायला मिळतात. कधी प्रमोशन निम्मित तर कधी काही खास प्रसंगी अनेक पाहुणे देखील या मंचाला भेट देतात. मराठी चित्रपट सृष्टीतील अशीच एक सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे यांनी विशेष अथिति म्हणून हजेरी लावलेली पाहायला मिळते. हाजत्रेच्या नुकत्याच पोस्ट करण्यात आलेल्या प्रोमो मधून ही माहिती समोर आली आहे.

पोस्ट करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अश्विनी भावे यांनी समीर चौघुले यांच्या लाजण्याच कौतुक केलेलं दिसतंय. त्याच बरोबर समीर, निमिष आणि शिवालीच्या लोकप्रिय स्किट मध्ये लिंबू कलर वरून विनोदनिर्मिती करण्यात आला त्याचा अश्विनी भावे यांनी सुद्धा भरभरून आनंद घेतल्याचा दिसतंय.(Ashvini Bhave in MHJ)
हे देखील वाचा – ‘हृदयी वसंत फुलताना….’ पुन्हा दोन मित्रांची झाली भेट
अशी ही बनवा बनवी किंवा अनेक मराठी धमाल चित्रपटांमधून अश्विनी भावे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकतीच त्यांनी अशोक सराफ यांच्या व्य्कयुम क्लिनर या नाटकाचा आनंद घेतला होता. त्यावेळी त्यांनी अशोक सराफ यांच्या सोबत एक फोटो पोस्ट केल्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा बनवाबनवी मधील त्यांच्या गाजलेल्या जोडीची आठवण आलेली पाहायला मिळाली.