Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा कार्यक्रम सध्या लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या रिऍलिटी शोमधील स्पर्धकांची चुरशीची लढतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या सीजनमधील स्पर्धकांपैकी एक लोकप्रिय कपल विशेष चर्चेत आले आहे. ते म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता लोखंडे व विकी जैन ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून चर्चेत आले आहेत. या शोमध्ये आल्यानंतर विकी व अंकिता यांच्यातील भांडण अधिक वाढली.
‘बिग बॉस’च्या घरात नील भट्ट व ऐश्वर्या शर्मासह अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी कपल एंट्री घेतली. दरम्यान, ऐश्वर्या शर्माला नुकतेच ईशाने घरातून बाहेर काढले. अंकिता लोखंडे व विकी जैन जेव्हापासून सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये आले तेव्हापासून या जोडप्यामध्ये बरेच भांडण पाहायला मिळाले. विकीने अंकितालाही अनेकदा शिवीगाळ केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे सलमानने त्याला खूप फटकारले.
या लोकप्रिय जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. अशातच अंकिता व विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रात्री झोपताना विकी व अंकिता इंटिमेट होताना दिसले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांच्या कृतीमुळे चाहत्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’ने त्यांच्या ट्विटर हँडलवर सदर व्हिडीओ शेअर केला आहे.
Yeh kya Farash Gola chal raha hai ????
— ALI ???????? (@buzar_moosvi) December 25, 2023
Control #VickyJain–#AnkitaLokhande control. This is a family show.
We know you guys are planning a baby but this is not the place. If you want a memorable baby then it's okay to do.????????#MunawarFaruqui#MunawarKiJanta#MKJW#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/t9rQyBL2nZ
विकी व अंकिताचा हा इंटिमेट होतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “तुम्ही शोमध्ये हे सर्व करू शकत नाही”, तर दुसर्या एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “तुम्ही विसरलात का की हा कौटुंबिक कार्यक्रम आहे” असा सवाल करत त्यांना धारेवर धरलं आहे.