छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. हिंदी मालिकेतून तिने सिनेविश्वातील स्वतःच स्थान पक्क केलं. अंकिता सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अशातच अंकिताने शेअर केलेल्या एका फोटोवरून सिनेसृष्टीत सगळीकडे खळबळ उडाली आहे.(Ankita Lokhande Pregnant)
पाहा अंकिताच्या खास फोटोशूटची झलक (Ankita Lokhande Pregnant)
अंकिताने सोशल मीडियावरून काही साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. यांत तिने हिरव्या रंगाची भरजरी साडी तिने नेसली असून त्यावर आकर्षक असे इअररिंग्ज घातले आहेत. दरम्यान तिने काढलेल्या या फोटोंमध्ये ती हात आणि पर्सचा वापर करून बेबी बंप लपवताना दिसतेय. अंकिताच्या या समोर आलेल्या फोटोंवरून ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबद्दल अंकिता आणि तिचा पती विकी जैन याने मौन पाळलं आहे. त्यांनी याबाबत आतापर्यंत काही भाष्य केलेलं नाही.
अंकिता लोखंडेच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अंकिता तू खरचं प्रेग्नेंट आहेस का? अशी कमेंट्स चाहत्याने केली आहेत. तर दुसरीकडे अंकिताचे साडीतील फोटो हे चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले दिसत आहेत.(Ankita Lokhande Pregnant)
हे देखील वाचा – लाल रंगाच्या साडीत समृद्धीचा हॉट अंदाज
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून अंकिता खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’ सोबत अंकिता ‘झलक दिखला जा 4′,’कॉमेडी सर्कस’ आणि ‘एक थी नायिका’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमां मध्ये झळकली. आता अंकिता आगामी कोणत्या प्रोजेक्त मध्ये दिसणार याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत.
