माणसू जन्मतः त्याच्या संघर्षाची कहाणी सुरु होत असते. भविष्यात त्याला किती ही संकटाना सामोरं जावं लागलं किंवा किती ही अडचणी त्याच्या सामोरं आल्या तरी त्यातून मार्ग काढून हवं आहे ते मिळवत असतो. यशस्वी होण्यासाठी करावी लागणाऱ्या मेहनतीची जिद्द फक्त त्याच्या मध्ये हवी. कमवता जॉब सोडून केवळ मनाला आनंद देणारा अभिनय करण्याचा आग्रह पूर्ण करण्यासाठी अभिनयाकडे वळलेले अभिनेते दिलीप जोशी म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून जेठालाल ही भूमिका अजरामर करणारे नट.(Dilip Joshi Struggle Story)
दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस.चित्रपटासाठी मालिका सोडणारे कलाकार पाहायला मिळतात पण मालिकेसाठी चित्रपट सोडणारे आणि प्रदीर्घ काळ ती मालिका चालवणारे खूप कमी अभिनेते पाहायला मिळतात दिलीप जोशी या अभिनेत्यांमध्ये येतात. सुरुवातीच्या काळात अभिनयाची आवड असून ही जबाबदारीसाठी मुंबई ते अमहदाबाद चालणाऱ्या बस सेवांमध्ये दिलीप यांनी काम केले. त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या स्ट्रगल स्टोरी बद्दल खुलासा केला आहे.
तिचं एक वाक्य आणि बदललं आयुष्य
सुरुवातीच्या काळात एका बस कंपनी मध्ये दिलीप यांनी काम केले. मुंबई ते अमहदाबाद, मुंबई ते भावनगर चालणाऱ्या या बस सेवेच्या कामात नितांत शारीरिक आणि मानसिक ताकदीची गरज होती. १९८५ ते १९९० या काळात त्यांनी ५ वर्षे ही नोकरी केली. एक दिवस त्यांना जाणवलं कि हे आपलं काम नाही जे आवडत ते करायला हवं. त्यांनी त्यांची हि इच्छा त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली. तेव्हा दिलीप जिंच्या पत्नीने त्यांना सांगितली कि मला करोडपती व्हायचं नाहीये ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद वाटेल आणि पोटाला पुरेसा अन्न मिळेल ती गोष्ट तुम्ही करा. पत्नीच्या या पाठिंब्याने दिलीप जोशी यांना बळ मिळालं.
हे देखील वाचा- आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली
पुढे त्यांनी मुंबईत येऊन परेश रावल यांच्यासह मिळून रंगभूमीवर अनेक कामे केली. हम आपके है कोण, मैने प्यार किया, वन टू का फोर,फिर भी दिल है हिंदुस्थानी अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या विनोदी मालिकेची ऑफर आली आणि या मालिकेमुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं. पुढे त्यांनी या मालिकेसाठी कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारली नाही. आणि तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील जेठालाल ही भूमिका त्यांनी कमाल अभिनयाने अजरामर केली.(Dilip Joshi Struggle Story)
दिलीप जोशी यांच्या अभिनयाला सलाम आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.