हल्लीच्या काळात अफवांना कलाकार किंवा प्रेक्षक एवढा वाव देत नसले तरीही आधीच्या काळात कलाकारांना अनेक अफवांना तोंड द्यावं लागत असे. अफवांच्या गराड्यात फासलेला असच एक नाव म्हणजे अभिनेते, दिगदर्शक दादा कोंडके. दादांच्या चित्रपटांसोबतच त्या चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार देखील तेवढेच चर्चेत राहिले.(Dada Kondke Usha Chavan)
दादांच्या बहुतांश चित्रपटात झळकलेले एक अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण. पळवा पळवी, एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, मला घेऊन चला, गिनिमी कावा, राम राम गंगाराम अशा अनेक चित्रपटांमध्ये उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्या सोयाबीत काम केले आहे.
त्याकाळी दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचं अफेअर च्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या पण यासंदर्भात एक महत्वाचं विधान दादांनी एका मुलाखतीत केलं होत. दादांच्या एका मित्राने त्यांना तुमच्या आणि उषा चव्हाण यांच्या मध्ये काही आहे का असा प्रश्न विचारलं तेव्हा दादांनी त्यांना सांगितलं होत कि माझ्यात आणि उषा मध्ये जवळीक होती पण ती फक्त कामाच्या बाबतीत होती.
आमच्या नात्यात तास काहीच न्हवत. त्याकाळी माझ्या मागे इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री होत्या पण माझ्या प्रसिद्धीमुळे आणि संपत्तीमुळे त्या माझ्या मागे होत्या नाहीतर एका म्हाताऱ्या सोबत ऐन तारुण्यातील अभिनेत्री लग्न करण्यास का तयार होईल असं देखील दादा म्हणाले.
हे देखील वाचा – दादांना राधानगरीच्या जंगलात सुचलं ‘वर ढगाला लागली कळं…’ वाचा नक्की काय आहे किस्सा
दादांबद्दल त्याकाळी उठलेल्या अनेक अफवांपैकी या अफवेवर दादांनी कायमचा पूर्णविराम लावला. दादा कोंडके म्हणजे शिस्त असं जुनी लोक आज ही अगदी हक्कानं सांगतात. दादांच्या शिस्तीचे अनेक किस्से सांगितले जातात. गावोगावी ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ हे दादांचं लोकनाट्य तुफान चाललेलं. अगदी विदर्भातून ते रत्नागिरीपर्यंत चर्चा असलेलं दादांचं हे लोकनाट्य एवढं गाजलं कि राजकारणी लोकांपासून ते अगदी इतर कलाकारांपर्यंत सगळ्यांना या नाटकाची भुरळ पडली होती.(Dada Kondke Usha Chavan)