अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख हे चित्रपटसृष्टीतील क्युट कपलपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वीच ही जोडी विवाहबंधनात अडकली. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी उपस्थित राहून त्यांच्या सोहळ्याची रंगत वाढवली. त्यांच्या लग्नसमारंभाचे तसेच हळदीचे, संगीतचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमृता व प्रसाद हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. (Prasad Jawade Birthday)
नुकताच प्रसादचा वाढदिवस झाला. हा वाढदिवस प्रसादसाठी खूप खास आहे. कारण लग्नानंतरचा त्याचा हा पहिला वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत अमृताने प्रसादसाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने त्याचे पन्नास वेगवेगळे मूड स्विंग शेअर केले होते. ‘हॅपी बर्थडे अहो’ असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली होती. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रसादचे बदलणारे मूड स्विंग पाहायला मिळाले.
आणखी वाचा – रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाला मोठा फटका, ऑनलाईन झाला लीक
यानंतर प्रसादच्या वाढदिवस साजरा करतानाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसादच्या राहत्या घरी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला पाहायला मिळत आहे. अमृताच्या आईने हा व्हिडीओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत अमृताने प्रसादचा वाढदिवस साजरा केलेला पाहायला मिळत आहे. अमृताने प्रसादच्या वाढदिवसानिमित्त केक आणला आहे. याशिवाय तिने त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्टचं आयोजन केलेलं ही पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, अमृता प्रसादसाठी गिफ्ट म्हणून आयफोनचा बॉक्स आणते, त्यावरून असं वाटतं की, अमृता आता प्रसादला आयफोन गिफ्ट देणार आहे. मात्र ती आयफोन न देता त्या बॉक्समध्ये खोटा खेळण्यातला फोन ठेवते. प्रसाद बॉक्स उघडून पाहतो तेव्हा खेळण्यातला फोन पाहून हसू लागतो, अशाप्रकारे अमृताने प्रसादच्या वाढदिवशी त्याची फजिती केलेली पाहायला मिळत आहे.