छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा नेहमी अत्यंत विनोदी या दृष्टिकोनाने पाहिला जाणारा हा शो सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील एका अभिनेत्री ने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नुकताच या अभिनेत्री ने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने हे गंबीर आरोप केले आहेत.(TMKOC actress Sexual harassment)
सेटवर बऱ्याचदा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे असं या मुलाखतीत या अभिनेत्री ने सांगितले आहे. जेनिफर मिस्त्री बन्सीवाल असं या आरोप करणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे. मुलाखतीत तिने सांगितले कि एकदा सिंगापूर मध्ये शूट करत असताना निर्मात्याने ‘ माझ्या खोलीत चल आपण दोघे दारू पिऊ’, सेटवर सगळ्यांसमोर सेक्सी म्हणत गाळ ओढत अनेक माझ्या सोबत अश्लील बोलण्याचा पर्यंत त्याने केला आहे असं तिने सांगितले.
हे देखील वाचा – दिग्दर्शक, निर्मात्यांनी शिव्या दिल्या, हाकललं पण आज मानानं घेतलं जात नाव..
पुढे ती म्हणाली एकदा होळीसाठी लवकर घरी जाणार असल्याचं सांगून सुद्दा तिला जाऊ दिलं नाही गाडी रस्त्यात थांबवून तिला धमकी देण्यात आली आणि तिचे पैसे देखील कापण्यात आले असे गंभीर आरोप तिने केले आहेत. वकिलांच्या मार्फत तिने या निर्मात्यांना नोटीस पाठवून देखील त्यावर कोणतंही उत्तर त्यांच्या कडून आलं नाही आता पोलीस मला नक्की न्याय देतील असं तिने सांगितले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या सेटवर निर्माते सहसा पुरुषांशी चांगलं जुळवून घेतात असा देखील एक सुरू जेनिफर ने केला आहे. तर आता पोलीस जेनिफरची ची ही तक्रार ऐकून काय कारवाई करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.(TMKOC actress Sexual harassment)