रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तू या घरातील घाण आहेस”, जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळीमध्ये तुफान राडा, चॅलेंजही केलं अन्…; कोण कोणावर पडणार भारी?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2024 | 11:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 new promo

जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळीमध्ये मोठा वाद

‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक मंडळींमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच या पर्वात स्पर्धक मंडळींमधील वाद पाहणंही रंजक ठरत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी यांची मैत्री संपलेली पाहायला मिळाली. आणि आता दोघींमध्ये वादही झालेला पाहायला मिळत आहे. जान्हवी पहिल्या दिवसापासून तिचा खेळ ‘टीम ए’बरोबर खेळत होती. अरबाज, वैभव, निक्की हे तिघे तिचे जवळचे मित्र होते. मात्र, कालांतराने जान्हवी अन् निक्कीची मैत्री तुटली.  (Bigg Boss Marathi Season 5 new promo)

आता जान्हवी वैयक्तिकरित्या तिचा गेम खेळताना दिसत आहे. तरीही, जान्हवीची अरबाज-वैभवबरोबर मैत्री कायम आहे. त्यामुळे अरबाजने कॅप्टन्सी उमेदवारीमधून जान्हवीला बाद करणं तिला अजिबात पटलं नाही. याबद्दल टास्क संपल्यावर जान्हवीने दोघांकडे विचारपूस केली. तेव्हा तिला हे निक्कीने करायला सांगितलं असल्याचं कळालं. हे ऐकताच जान्हवीचा पारा चढला. आणि जान्हवीने निक्की व अरबाज विरोधात खेळायचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ट्रॉफी मिळो ना मिळो पण…”, निक्कीची अरेरावी जान्हवीला खटकली, ‘टीम बी’कडे राग व्यक्त करत म्हणाली, “हिचा गर्व…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचा राग अनावर झालेला पाहायला मिळत असून ती टीम बी कडे निक्की विरोधात बोलताना दिसत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी म्हणते, “ट्रॉफी मिळो ना मिळो पण हिचा गर्व उतरवायचा आहे”, असं बोलताना दिसली. यानंतर जान्हवी व निक्की अगदी समोरासमोर येत एकमेकींना भिडताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : चुकीला माफी नाही! निक्कीच्या कानाखाली मारणं आर्याला पडणार महागात, घराबाहेर काढणार का?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्कीला म्हणते, “दम असेल तर मला बाहेर काढून दाखव. चॅलेंज आहे”. यावर निक्की म्हणते, “कॅप्टन्सीमधून काढलं आहे त्याचा तिला खूप राग आला आहे”. यावर जान्हवी निक्कीवर आवाज चढवत म्हणते, “तुला कोणी मराठी जनता ओळखत नव्हती म्हणून तू या शोमध्ये आली आहेस. सगळ्यांना घाण झाली आहेस तू या घरामध्ये”. यावर निक्कीही जान्हवीवर ओरडून बोलते, “बघा हिचे गटार सारखे शब्द आहेत”. त्यावर जान्हवी म्हणते, “उगीच फडफड, फडफड चल”. आता हा प्रोमो पाहून हा वाद नेमका का झाला याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi Season 5 New Promonikki tamboli and jahnavi killedar fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg boss marathi update

"गांव कधी बघतोय असं झालंय”, गावच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, मन मोकळं करत म्हणाला, “स्वतःवर नियंत्रण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.