शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, अभिनेता भडकला, म्हणाला, “मुलीला त्रास होतोय कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2024 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreyas Talpade Update

निधनाच्या बातम्यांच्या अफवांवर श्रेयस तळपदेने केलं भाष्य, संताप व्यक्त केला आणि...

काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती. श्रेयसला हृदय विकाराचा झटका आला होता. या आजारपणातून आता श्रेयस बर्यापैकी सावरला असून आता त्याने चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. उपचारानंतर बरं झाल्यानंतर आता श्रेयसच्या तब्येतीवरुन त्याचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. या निधनाच्या पोस्टवर आता अभिनेत्याने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत हयात असल्याचं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. (Shreyas Talpade Update)

श्रेयसने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “मी जिवंत आहे, आनंदी आहे व निरोगी आहे हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. हा विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरु झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजीचं वातावरण निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरुन माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे. माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते. ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढत आहे. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : ब्रँड अँबेसेडर म्हणून पारूचा विजय, दिशाचा खरा चेहरा आला सर्वांसमोर, अहिल्यादेवींनी घरातून हाकलून दिलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

पुढे तो असंही म्हणाला आहे की, “अशा पोस्ट करणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांनी हे थांबवावं आणि या पोस्टच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे. लोकांच्या भावना दुखावण्यासाठी विनोदाचा वापर केला जात आहे हे पाहून वाईट वाटतं. कारण या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि आमच्या आयुष्यात व्यत्यय आणतात. जेव्हा तुम्ही अशा अफवा पसरवता तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही तर तिच्या कुटुंबावरही परिणाम होतो. खासकरुन लहान मुलं जे या गोष्टी समजू शकत नाही”.

आणखी वाचा – “त्याचा आवाजही गेला अन्…” बायकोने सांगितली कॅन्सरमध्ये अतुल परचुरेंची कशी होती अवस्था?, म्हणाल्या, “वाईट वाटायचं आणि…”

“ज्यांनी माझी विचारपूस केली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी व प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आही. ट्रोलर्सला माझी एकच विनंती आहे की कृपया हे सगळं थांबवा. दुसऱ्यांवर असे विनोद करु नका. तुमच्याबरोबरही असं काही घडावं असं मला कधीच वाटणार नाही, त्यामुळे थोडे संवेदनशील व्हा”.

Tags: shreyas talpade death rumoursshreyas talpade healthShreyas Talpade Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki vaibhav fight

Bigg Boss Marathi : "तुझं तोंड शांत ठेव", निक्कीची मनमानी बघताच वैभवने तिला तिथेच टोकलं, म्हणाला, "परस्पर मतं मांडते आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.