रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शशांक केतकरकडून दोन्ही मुलांचा चेहरा Reveal, दिसतात इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2025 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar daughter and son

शशांक केतकरकडून दोन्ही मुलांचा चेहरा Reveal, दिसतात इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; फोटो व्हायरल

Shashank Ketkar daughter and son : कलाकार मंडळींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास चाहतेमंडळी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, त्यांचा संसार कसा सुरु आहे, त्यांचे जोडीदार कोण आहेत, त्यांची मुलं कशी दिसतात ती काय करतात याबाबत जाणून घेणं चाहत्यांना नेहमीच उत्सुकतेचं वाटतं. तर बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळी ठेवण्याकडे अधिक भर देतात. त्यांना वैयक्तिक आयुष्य इतरांसह शेअर करणं योग्य वाटत नाही. पण योग्य वेळ आली की, ही मंडळी त्यांच्या चाहत्यांना वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनुभवही सांगतात.

अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या दोन्ही मुलांचा चेहरा रिव्हील केला आहे. हा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. अभिनयाबरोबरच तो सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असून, आपल्या खासगी आयुष्यातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. अलीकडेच भाऊबीजेच्या दिवशी शशांकने आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याने आपल्या लेकीचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांना दाखवला आहे.

आणखी वाचा – घरच्या लक्ष्मीचं औक्षण, मुलांचं अभ्यंगस्नान आणि…; रितेश देशमुखने जपली परंपरा, यंदा मुंबईत साजरी केली दिवाळी

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शशांक जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा बाबा झाला होता. त्याची लेक राधा आता नऊ महिन्यांची झाली असून, तिचे काही गोंडस फोटो शशांकने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने आपला मोठा मुलगा ऋग्वेद आणि छोटी लेकी राधा यांचे एकत्र फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी… केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा” असं लिहीत भावना व्यक्त केल्या. या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव सुरु झाला. मराठी सेलिब्रिटीदेखील शशांकच्या या गोड पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसले. अभिनेत्री तितिक्षा तावडे, अभिनेता अभिजित खांडकेकर आणि आशुतोष गोखले यांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या, तर शिवानी मुंढेकरने देखील “ किती गोड आहे!” असं म्हणत कमेंट केलं आहे.

आणखी वाचा – साऊथ इंडियन लूकला मराठमोळा टच; रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली दिवाळी, नवऱ्याचं औक्षण केलं अन्…

शशांक केतकरच्या या पोस्टला चाहत्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला असून, काहींनी तर “राधा अगदी शशांकसारखी दिसते” असं म्हटलं आहे, तर काहींनी “आई प्रियांका ढवळेसारखीच दिसते” अशी कमेंट केली आहे. खरंच, शशांकच्या कुटुंबाचे हे गोंडस फोटो पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आहे.

Tags: entertainmentmarathi actorshashank ketkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Ram Charan second baby

लग्नाच्या १३ वर्षांनी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीचे केले थाटामाटात डोहाळ जेवण, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.