रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साऊथ इंडियन लूकला मराठमोळा टच; रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली दिवाळी, नवऱ्याचं औक्षण केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2025 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Reshma Shinde Diwali

साऊथ इंडियन लूकला मराठमोळा टच; रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली दिवाळी, नवऱ्याचं औक्षण केलं अन्...

Reshma Shinde Diwali : सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी कपलची यंदा लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे ही मंडळी अगदी थाटामाटात, पारंपरिक अंदाजात यंदाची दिवाळी साजरी करताना दिसले. अशातच मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने देखील तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी अगदी थाटामाटात साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. रेश्मा शिंदेने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्न केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्रीनं शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करत सुखद धक्का दिला. अभिनेत्रीचा नवरा पवन हा साऊथ इंडियन आहे.

यंदा रेश्मा आणि पवनने त्यांच्या घरी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. रेश्माने दिवाळी पाडव्यानिमित्त हे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. समोर आलेल्या या फोटोंमध्ये ती पतीला उटणं लावताना दिसत आहे. त्याचबरोबर रेश्माच्या व्हिडीओमध्ये एक चिमुकलाही दिसतोय. आणि तो देखील अभ्यंगस्नान करताना दिसत आहे. यावेळी रेश्माच्या नवऱ्याचा साऊथ इंडियन लूक लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “माझे अंतिम संस्कार खासगी ठेवावेत”, दिवंगत अभिनेते असरानींप्रमाणे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा, म्हणाले, “ओझं बनून…”

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

लग्नानंतरचा प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करताना दिसते. रेश्माचा नवरा हा साऊथ इंडियन असूनही त्याने पत्नीला साथ देत अगदी मराठमोळ्या अंदाजात प्रत्येक सण साजरा केला आहे. रेश्मा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नवऱ्याबरोबरचं बॉण्डिंग नेहमीच ती शेअर करताना दिसली आहे. आताही तिच्या पहिल्या दिवाळसणाच्या फोटोंवर कलाकार मंडळींनी कमेंट करत पसंती दर्शविली आहे.

आणखी वाचा – घरच्या लक्ष्मीचं औक्षण, मुलांचं अभ्यंगस्नान आणि…; रितेश देशमुखने जपली परंपरा, यंदा मुंबईत साजरी केली दिवाळी

सध्या रेश्मा स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. यापूर्वीही रेश्माने मराठी मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केली. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर रेश्माने साऊथ इंडियन पवनसह लग्नगाठ बांधली आहे. अभिनयाची धुरा सांभाळत ती तिच्या संसाराकडे, कुटुंबाकडेही लक्ष देताना दिसते.

Tags: diwali celebrationmarathi actressreshma shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shashank Ketkar daughter and son

शशांक केतकरकडून दोन्ही मुलांचा चेहरा Reveal, दिसतात इतकी सुंदर की सगळेच पाहत बसले अन्…; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.