सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरच्या लक्ष्मीचं औक्षण, मुलांचं अभ्यंगस्नान आणि…; रितेश देशमुखने जपली परंपरा, यंदा मुंबईत साजरी केली दिवाळी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2025 | 9:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
riteish deshmukh diwali

घरच्या लक्ष्मीचं औक्षण, मुलांचं अभ्यंगस्नान आणि…; रितेश देशमुखने जपली परंपरा, यंदा मुंबईत साजरी केली दिवाळी

riteish deshmukh diwali : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत असणारं कुटुंब म्हणजे देशमुख कुटुंब. देशमुख कुटुंब सिनेविश्वासह राजकारणातही सक्रिय आहे. सोशल मीडियावर हे कुटुंब नेहमीच सक्रिय असलेलं पाहायला मिळालं आहे. सणवारात हे कुटुंब एकत्र असलेलं पाहायला मिळतं. देशमुख परिवार हा मूळचा लातूरचा आहे. त्यामुळे बरेचदा सण साजरे करण्यासाठी ते लातूरच्या त्यांच्या घरी एकत्र जमतात. दिवाळी असो, गणपती असो वा दसरा असो व्यस्त वेळातून वेळ काढत ते एकमेकांना वेळ देतात. मात्र यंदाच्या दिवाळीला रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लातूरला गेले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून रितेश त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दिवाळी लंचला सुद्धा तो उपस्थित नव्हता. यामुळे त्याच्या दोन्ही मुलांनी अभिनेत्यासाठी खास पत्र लिहिलं होतं आणि ‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रदर्शित झाल्यावर भरपूर यश मिळूदेत अशा शुभेच्छा त्यांच्या लाडक्या बाबाला दिल्या होत्या. रितेश देशमुख यानंतरही त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत मुंबईच्या घरी पोहोचला आहे. आणि त्यानंतर रितेशने जिनिलिया आणि त्याच्या दोन्ही मुलांसह दिवाळी पाडवा साजरा केला. सर्वप्रथम त्याने रियान आणि राहिल यांना उटणं लावून अभ्यंगस्नान घातलं. यानंतर रितेशची दोन्ही मुलं रांगोळी काढत असल्याचं अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. त्यानंतर रितेश आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी जिनिलियाच औक्षण केलं.

आणखी वाचा – “माझे अंतिम संस्कार खासगी ठेवावेत”, दिवंगत अभिनेते असरानींप्रमाणे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा, म्हणाले, “ओझं बनून…”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

व्हिडीओच्या शेवटास चौघांनी मिळून दिवाळी पाडव्याच्या साऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने भावुक कॅप्शन दिलं आहे. यंदाच्या दिवाळीला त्याला कुटुंबासह लातूरला जाता आलं नाही म्हणून त्याने नाराजी व्यक्त केली आहे. रितेशने कॅप्शन देत म्हटलं की, “दरवर्षी आम्ही दिवाळीचा सण आमच्या कुटुंबीयांबरोबर बाभळगाव लातूर येथे साजरा करतो”.

आणखी वाचा – बांदेकरांच्या लेकाच्या ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष, सोहमने दिली पूजा बिरारीवरील प्रेमाची कबुली, चर्चेला उधाण

पुढे त्याने लिहिलं, “पण, यावर्षी ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग सुरू असल्यामुळे आम्ही लातूरला जाऊ शकलो नाही. पण, आमच्या घरच्या परंपरा आम्हाला कायम लक्षात राहणार आहेत… यामुळेच आम्ही मुंबईत दिवाळी पाडवा साजरा केला. तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! खूप प्रेम, देशमुख परिवार”. रितेशच्या या व्हिडीओला लाईक्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

Tags: diwali celebrationmarathi actorriteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
deepika kakar cancer

केस गळतायत, थायरॉईड वाढलाय आणि…; कॅन्सरच्या उपचाराने दीपिका कक्करची अवस्था वाईट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.