रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: “सतत नशेत असतो”, पार्टी करुन बाहेर आल्यानंतर शाहरुख खानच्या लेकाला बघून नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “इतका गंभीर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aryan khan viral video

“सतत नशेत असतो”, पार्टी करुन बाहेर आल्यानंतर शाहरुख खानच्या लेकाला बघून नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “इतका गंभीर...”

हॉलिवूड गायक एड शीरन हा भारतात एका कार्यक्रमासाठी मंगळवारी मुंबईमध्ये दाखल झाला आहे. त्याने मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका शाळेलाही भेट दिली. शाळेमध्ये जाऊन त्याने तेथील लहान मुलांबरोबर खूप मजा मस्ती केली आणि गाणीही गायली. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्याच्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. त्यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान उपस्थित राहिला होता. (aryan khan viral video)

एड शिरनसाठी गौरी खानच्या एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. यामध्ये आर्यन देखील उपस्थित होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम जॅकेट व व जीन्स घातली आहे. त्याचे केस विस्कटलेलेही दिसत आहेत. त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

आणखी वाचा – “तुमची खूप आठवण येते”, अभिषेक बच्चनने वडिलांना लिहिलेलं भावुक पत्र व्हायरल, म्हणालेला, “तुमच्या चेहऱ्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तो इतका गंभीर का असतो?”, दुसरा नेटकरी लिहितो की, “हा नेहमी नशेमध्ये का असतो?”, तसेच अजून एक नेटकरी लिहितो की, “हा नेहमीच नशेमध्ये असतो”. पण काही नेटकऱ्यांनी मात्र त्याला साथ देताना दिसत आहेत. याआधीही आर्यन बऱ्याच वेळा ट्रोल झाला आहे.

आणखी वाचा – विंदू दारा सिंगचं तब्बूच्या बहिणीबरोबर पहिलं लग्न, काही वर्षांतच मोडला संसार, दुसऱ्यांदा विवाह केला अन्…; म्हणाला, “धर्मामध्ये…”

या पार्टीमध्ये शाहरुख खान, हृतिक रोशन, सबा आझाद, मलायका आरोरा, राजकुमार राव, पत्रलेखा, हुमा कुरेशी, फरहान अख्तर, अनुषा दांडेकर, अर्शद वारसी त्याची पत्नी मारिया, माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने हे कलाकार उपस्थित होते. या पार्टीचं सूत्रसंचालन कॉमिडी किंग कपिल शर्माने केले होते.    

Tags: aryan khanEd sheeranHollywood singershahrukh khanviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Neena Gupta Incident

…म्हणून "चोली के पीछे क्या है…" गाण्यासाठी नीना गुप्तांनी दिलेला नकार, म्हणाल्या, "जर माधुरी दीक्षित…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.