शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून “चोली के पीछे क्या है…” गाण्यासाठी नीना गुप्तांनी दिलेला नकार, म्हणाल्या, “जर माधुरी दीक्षित…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 16, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Neena Gupta Incident

...म्हणून "चोली के पीछे क्या है..." गाण्यासाठी नीना गुप्तांनी दिलेला नकार, म्हणाल्या, "जर माधुरी दीक्षित..."

१९९३ मध्ये सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सुपरडुपर हिट चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’, हे गाणं आजही लोकप्रिय आहे. कोणत्याही कार्यक्रमात हे गाणं हमखास गाजवलं जातं. या गाण्यावर अश्लील नावाचा टॅग जरी असला तरी हे गाणं लोकप्रिय आहे. या गाण्यात अभिनेत्री नीना गुप्ता दिसली होती. नीना गुप्ता यांनी या गाण्यात काम केलं असलं तरी त्यांनी याआधी ते गाणं करायला नकार दिला होता. या नाकारामागचं कारण आता ३१ वर्षांनंतर समोर आलं आहे. (Neena Gupta Incident)

या चित्रपटावेळी नीना गुप्ता या नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल नाहाटा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटातील या गाण्याचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांना या गाण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी ते आधीच नाकारले होते. त्यांना असे गाणे करायचे नव्हते जिथे त्या माधुरीच्या मागे दिसतील. कारण त्या आघाडीची अभिनेत्री होत्या’. नीना गुप्ता यांनी सांगितले की, ‘त्या गाण्यात त्यांची छोटीशी भूमिका होती’. यानंतर त्यांनी त्याचा मित्र सतीश कौशिक याला जाऊन दिग्दर्शकाला सांगण्यास सांगितले की, ‘त्यांना या गाण्यात रस नाही. इतकंच नाही तर त्यांना अशी भूमिका ऑफर झाल्याने त्या संतापल्या होत्या’.

आणखी वाचा – “तू माझ्यासाठी पुरणपोळी बनवशील का?”, लग्नानंतर सौरभ चौघुलेचा बायकोला प्रेमळ प्रश्न, योगिता चव्हाण म्हणाली, “शूटिंगवरुन घरी…”

नीना गुप्ता म्हणाल्या, “मी सतीशला हे गाणे नको असं म्हटलं होतं. कारण पहिली गोष्ट म्हणजे मी डान्सर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे माझे गाणे नाही. आणि त्यात माझा पूर्ण नृत्यही नाही”. मात्र, नंतर सुभाष यांनी नीना यांना वैयक्तिक फोन करुन हे गाणे करायला सांगितलं आणि तिला या गाण्यामुळे कोणताही नुकसान होणार नाही, असंही सांगितले. त्यानंतर नीना गुप्ता यांनी होकार दिला आणि हे गाणे केले.

आणखी वाचा – Video : नवऱ्याचं साताऱ्यामध्ये शूट सुरु असताना त्याच्या सेटवर पोहोचली अमृता देशमुख, किर्लोस्करांच्या घरी गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

एवढा मोठा अनुभवी दिग्दर्शक तिला काहीतरी बोलतोय, असं त्यांना वाटत असल्याचं नीना यांनी यावेळी बोलताना सांगितलं. गाणे वाजेल की नाही हे नंतर ठरेल. आणि जर गाणं चाललं नाही तर त्यामुळे त्यांचे काही नुकसान होणार नव्हते. त्यानंतर त्यांनी हे गाणं करण्यास होकार दिला. सुरुवातीला हे गाणे ऐकल्यावर त्यांना आवडलं. त्यानंतर हे गाणं एवढ हिट होईल असं त्यांना वाटलंही नव्हतं.

Tags: entertainmentneena guptaneena gupta danceNeena Gupta Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Alka Kubal Mangalsutra Design

पुरस्कार सोहळ्यात अलका कुबल यांनी घातलेल्या मंगळसूत्राची चर्चा, पेंडंट होतं खूपच खास, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.