‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त समोर येत आहे. अचानक खालवलेल्या प्रकृतीमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली आहे. इतकंच नव्हे तर रुग्णालयात गुरुचरणचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित नाहीत. त्याच्या कुटुंबीयांना फोन ‘स्विच ऑफ’ करुन ठेवल्याचं भक्तीने सांगितलं आहे.(gurucharan singh health update)
भक्ती सोनीने गुरुचरणच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्याला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती आणखी खराब झाल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. सध्या सरकारी रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी मी त्याच्या आईच्या सतत संपर्कात आहे”, असं भक्तीने ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
आणखी वाचा – “पप्पा जाऊन चार वर्षे झाली पण…”, वडिलांच्या आठवणीत रवी जाधव भावुक, म्हणाले, “त्यांची आठवण…”
भक्ती सोनीने पुढे असंही म्हटलं की, गुरुचरण गेल्या १९ दिवसांपासून अन्न-पाण्याविना राहत होता. त्याने सर्व गोष्टींचा त्याग केला होता. म्हणून त्याची शुद्ध हरपली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. त्याच्यावर १.२ कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण त्याच्या वडिलांकडे ५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुर्दैवाने प्रॉपर्टीसंदर्भात काही वाद सुरू आहेत. जर हे प्रकरण मिटवता आलं आणि प्रॉपर्टी विकली गेली, तर गुरुचरण त्याचं कर्ज फेडू शकेल” असं तिने म्हटलं आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरुचरणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं होतं की, “परिस्थिती खूपच वाईट झाली आहे”. या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे पाहायला मिळालं होतं. तसंच त्याची तब्येतही बारीक झाली असल्याचे या व्हिडीओमधून दिसले. त्यानंतर आता अभिनेत्याच्या मैत्रिणीने धक्कादायक माहिती दिली आहे