शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2025 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Sangram Salvi reacted to his wife Khushboo Tawde's absence in baby shower event

“म्हणून खुशबू तावडेच्या डोहळ जेवणाला नव्हतो”, संग्राम साळवीने सांगितलं नेमकं कारण

अभिनेत्री खुशबू तावडेच्या घरी काही दिवसांपूर्वी तिच्या दुसऱ्या गारोदरपणाबद्दलची खुशखबर दिली. एका लहान मुलीला जन्म देत खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वी खुशबूने ही आनंदाची बातमी जाहीर केली. याआधी २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबूला मुलगा झाला होता. ज्याचं नाव राघव असून तो आता तीन वर्षांचा आहे. त्यानंतर खुशबू व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्या पाहुण्याचं आगमन झालं. जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं. याची खास झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं हे दुसरं डोहाळे जेवण पार पडलं.  मात्र या खास कार्यक्रमासाठी खुशबूचा नवरा गैरहजर होता. (sangram salvi on khushboo tawde baby shower)

खुशबूच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संग्राम साळवी दिसला नव्हता. कारण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या अनुपस्थितीबद्दल आता संग्रामने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. थोडंसं वाईट वाटतं. पण जे काम करत आहे, ते माझ्या कुटुंबासाठीच आहे हाच त्यामागचा विचार असतो असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढीची प्रकृती गंभीर, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, १९ दिवसांपासून अन्न-पाणीही पोटात नाही अन्…

इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत संग्रामने असं म्हटलं की, “थोडंसं वाईट वाटतं. घरी एखादा कार्यक्रम असेल आणि सगळे तिथे असतील तर मीही असलो पाहिजे असं वाटतं. पण कुठे तरी मनात हा दूसरा विचारही येतो की, मी आता जे काम करत आहे, ते माझ्या कुटुंबासाठीच आहे. माझ्या चांगल्या भविष्यासाठीच आहे. त्यामुळे घरचेही समजून घेतात. पण घरी गेल्यावर मी राघव आणि राधीशी बोलल्यावर सगळा थकवा आणि जे काय आपण कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो हे निघून जातं. मग पुन्हा नव्याने सुरुवात होते”.  

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी

दरम्यान, अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २०१८ साली लग्न केले. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव राघव असून नुकतंच खुशबूच्या घरी एका चिमुकलीचेदेखील आगमन झाले आहे, जिचे नाव राधी असं ठेवण्यात आलं आहे

Tags: khushboo tawde husbandkhushboo tawde husband sangram salvisangram salvi on khushboo tawde baby shower
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Priya Bapat And Umesh Kamat

"निर्मात्यांना उमेशबरोबर चित्रपट का करावा वाटत नाही?", प्रिया बापटची खंत, म्हणाली, "छान काम करुनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.