शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने रितेश देशमुखला धक्का! न्यायाचे आवाहन करत म्हणाला, “गुन्हेगारांना कठोर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 13, 2024 | 10:20 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
riteish deshmukh on baba siddiqui death

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने रितेश देशमुखला बसला धक्का

baba siddiqui death : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या वृत्ताने संपूर्ण देश हादरला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी ऐकून बॉलिवूड कलाकारांना धक्का बसला आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर अवस्थेत त्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सलमान खानपासून ते संजय दत्त आणि शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रितेश देशमुखनेही सोशल मीडियावर व्यथा मांडत न्यायाची मागणी केली आहे.

रितेश देशमुखने X वर लिहिले की, “बाबा सिद्दीकीजी यांच्या दुःखद निधनाबद्दल मला खूप दुःख झाले आणि धक्का बसला. झीशान सिद्दीकी (त्यांचा मुलगा) आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती देवो. या जघन्य गुन्ह्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होऊन योग्य तो न्याय मिळायलाच हवा”. टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीनेही बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अभिनेत्रीने लिहिले आहे की, “आमचे प्रिय बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने खूप धक्का बसला आणि दु:ख झाले. न्यायाची मागणी करा आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा, कुटुंब व मित्रांबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना”.

आणखी वाचा – मसाबा गुप्ताला कन्यारत्न, अष्टमीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी घरी आली, नीना गुप्ता यांच्या नातीची पहिली झलक समोर

Extremely saddened and shocked beyond words to learn about the tragic demise of Shri #BabaSiddique ji – My heart goes out to @zeeshan_iyc and the entire family- May god give them strength to brave this difficult time. The perpetrators of this horrific crime must be brought to… pic.twitter.com/zjNLnspbrp

— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2024

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समोर येताच सलमान खानने ‘बिग बॉस १८’चे शूटिंग थांबवले आणि लगेच लीलावती हॉस्पिटल गाठले. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या कारमध्ये होते, असे सांगण्यात येत आहे. दोन शूटर हरियाणातील आणि एक यूपीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानशिवाय संजय दत्त, प्रिया दत्त, वीर पहाडिया, झहीर इक्बाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

आणखी वाचा – बाबा सिद्दीकींची हत्या, बॉलिवूड कलाकारांनी रुग्णालयात घेतली धाव, सलमान खान, शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर

शिल्पा शेट्टीही पती राज कुंद्रासह हॉस्पिटलबाहेर दिसली. यावेळी तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि बाबा सिद्दीकी यांच्यात चांगले बॉण्ड असल्याची माहिती आहे. सलमानपासून शाहरुखपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्याच्या इफ्तार पार्टीत हजेरी लावत असत.

Tags: baba siddiqui deathbollywood actorsriteish deshmukh on baba siddiqui death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Baba Siddiqui salman khan and shahrukh khan

बाबा सिद्दीकी यांनीच शाहरुख-सलमान खानमधील मिटवला होता वाद, इफ्तार पार्टीत गळाभेटही घेतली, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.