मनोरंजन क्षेत्रामध्ये कोण कधी चर्चेत येईल ही सांगता येत नाही. आजपर्यंत अनेक व्यक्ती या क्षेत्रात आल्या आमो गायबही झाल्या. अशातच काही माहिन्यांपूर्वी सर्वांसमोर सातत्याने येणारं नाव म्हणजे ‘ऑरी’. ऑरी हा बॉलिवूडमधील प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक कलाकाराबरोबर दिसून येतो. ईशा अंबानीचा खास मित्र असल्याचेही ऑरीने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. नुकताच तो अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये दिसून आला होता. त्याचे हॉलिवूड पॉपस्टार रिहानाबरोबर पोज देतानाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. पण नुकतेच रणवीर ऑरीबद्दल भाष्य केले आहे. (Ranveer singh on orry)
अनंत व राधिकाच्या तीन दिवसीय सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गज व्यति उपस्थित होत्या. बॉलिवूडमधीलही अनेक मोठे कलाकार आले होते. अनेक कार्यक्रमाचे सादरीकरणही केले. त्याच वेळचा ऑरी व रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वतः ऑरीने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये रणवीर ऑरीला ओळखत नसल्याचे म्हणत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर ऑरीची ओळख करुन देताना दिसत आहे तो म्हणतो की, “नमस्कार हा ऑरी आहे. हा नक्की काय करतो हे मला आजपर्यंत समजले नाही”. यावर अर्जुन कपूर मध्येच म्हणतो की, “ऑरी लिव्हर आहे”. ऑरी हा अनेक कार्यक्रमांमध्ये जाऊन किंवा मुलाखतीमध्ये लिव्हर (जगणारा) आहे असा सांगतो.
पुढे रणवीर म्हणतो की, “ऑरी हा खर तर अभ्यासाचा एक विषय आहे. जर ऑरीने तुमच्या छातीवर असा हात ठेवतो आणि असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो. याचा अर्थ असा की ऑरीने तुम्हाला मंजूरी दिली आहे. पण जर त्याने हात ठेवला नाही तर समजा की तुम्हाला अजून काम करण्याची गरज आहे. हे सर्व खरं आहे ना?” असं रणवीर त्याला विचारतो. त्यावर ऑरी म्हणतो की, “मी जर असा हात ठेवला तर ते जास्त माझ्याशी जोडले जातील”.
ऑरी एकदा ‘बिग बॉस १७’ मध्येही दिसून आला होता. त्यामध्ये त्याने सलमानला सांगितले होते की, “मला पार्टीमध्ये बोलवण्याचे पैसे मिळत नाहीत तर कलाकार ही त्यांचे कुटुंबीय किंवा मुलांबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी सांगतात. त्यासाठी एका रात्रीचे २० ते ३० लाख रुपये मिळतात”. याबरोबरच तो म्हणाला की, “माझ्या स्पर्शाने आजार व स्वास्थ्य संबंधित समस्या दूर होतात”.
दरम्यान ऑरी व रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.