असे अनेक चित्रपट असतात जे कितीही वर्ष जुने झाले तरीही त्यांची जादू कमी होत नाही. त्या चित्रपटातील काही ना काही सीन हे लक्षात असतातच. त्यातील एक चित्रपट म्हणजे २००९ साली प्रदर्शित झालेला ‘थ्री इडियट्स’. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती. सर्व विक्रम मोडीत काढले होते. पण नुकताच या चित्रपटातील एका सीनबद्दल आश्चर्यजनक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा चित्रपटामध्ये फरहानची भूमिका साकरणारा कलाकार आर माधवन. त्याने नुकतेच एका मुलाखतीबद्दल सविस्तर सांगितले आहे. (R Madhavan on aamir khan)
‘बियरबायसेप्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर माधावनने जुन्या चित्रपटातील सर्व आठवणी ताज्या केल्या आहेत. त्याने सांगितले की, “या चित्रपटामध्ये एक असा सीन आहे ज्यामध्ये रॅंचो, राजू व फरहान हे तिघे मिळून कॉलेज प्रिन्सिपलच्या घरी जाऊन लघवी करतात. या सीनमध्ये तिघांनाही दारू प्यायलेल्या अवस्थेत दाखवायचे होते. पण आम्ही या सीनसाठी खरच दारू प्यायलो होतो”.
पुढे तो म्हणाला की, “ही कल्पना दुसरी तिसरी कोणाचीही नसून अभिनेता आमिर खानची होती. त्याचं म्हणणं होतं की दारू प्यायल्याचा कधीही अभिनय करु नका तर खरच दारू प्या. आमचे शूट रात्री ९ वाजता होते. आमिरने आम्हाला आठ वाजल्यापासून दारू पाजायला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही सीन चित्रित करण्यास सुरवात केली. शूट चित्रित करण्यास आम्हाला खूप उशीर झाला. त्यानंतरही आम्ही तिघांनीही आमचे संवाद पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन तास लावले”.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील हा सीन अधिक पसंत केला गेला होता. या चित्रपटांमध्ये आमिर खान, आर माधवन व शर्मन जोशी यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या. त्यांच्याबरोबरच यामध्ये बोमन इराणी, करीना कपूर,ओमी वैद्य, मोना सिंह हेदेखील या भूमिकेमध्ये दिसून आले होते. नुकताच आर माधवन याचा ‘शैतान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली आहे.