अभिनयाचं वारं ज्याच्या अंगी भिनल त्या कलाकाराची मजबूत बाजू ही अभिनय आणि कमकुवत बाजू ही अभिनयचं असतो. कलेला अग्रस्थानी ठेऊन कलेशी नाळ जोडून राहिलेले मराठी इंडस्ट्रीतील महानायक अभिनेते अशोक सराफ. पांडू हवालदार ते अगदी हल्लीच ‘वेड’ मधील छोट्या झलकेने वर्षे गेली तरी विनोदाची वेळ अजून तिचं अगदी जिथं हवी तिथे याची जाणीव मामांच्या अभिनयातून होते. संपूर्ण मनोरंजन विश्व अशोक सराफ याना मामा म्हणून ओळखत. आजही ठराविक घटकांना विचारलं की तुमच्या आवडत्या कलाकारांच्या यादीतील एखादं नाव सांगा तर हक्काने अशोक मामा असं सांगितलं जात.(Prithvik Pratap Ashok Saraf)
मनोरंजन सृष्टीत काम करणारा प्रत्येक छोटा मोठा कलाकार जो कलेला अग्रस्थानी ठेऊन काम करत असतो. काम करत असताना देखील तो नेहमी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेऊन आपल्या कामात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना पाहून लहानपणापासून भेटण्याची इच्छा होते असे अनेक कलाकार आहेत त्या पैकी एखाद्या कलाकाराची भेट होते तेव्हा होणार आनंद एक वेगळीच स्फ्रुती देणारा असतो.
असच काहीस झालाय विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप सोबत एका कार्यक्रम दरम्यान पृथ्वीकची त्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या मामांसोबत म्हणजे अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबत भेट झाली. त्या संदर्भात एक पोस्ट त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केली आहे.
====
हे देखील वाचा – ‘प्रेमात मी स्वतःला हरवून बसले..’
====
पृथ्वीकची भावनिक पोस्ट(Prithvik Pratap Ashok Saraf)
अशोक सराफ यांच्या सोबत एक फोटो पोस्ट करत पृथ्वीक ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे ‘अशोक मामांना आपलं नाव माहित असणं, त्यांनी आपल्या कामाचं कौतुक करणं आणि त्यात आपल्या कामासाठी संपूर्ण टीम ला त्यांच्यासमोर अवॅार्ड मिळणं… हे सारे स्वप्नवत आहे. ‘ कॅप्शन मध्ये आपल्या भावना व्यक्त करत अशोक मामानं त्याच नाव माहिती होत आणि त्याच्या कामाबद्दल अशोक सराफ यांनी केलेलं कौतुक ऐकून पृथ्वीकने भावनिक होऊन ही पोस्ट लिहिल्याचं दिसतय. अशोक सराफ यांच्या कडे पाहून अभिनय क्षेत्रात पुढे जाऊ पाहणारे अनेक होतकरू कलाकार त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतील एवढं नक्की.(Prithvik Pratap Ashok Saraf)

अशोक सराफ यांना नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. तर पृथ्वीक प्रताप हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.