शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बॉइज’ चित्रपट फेम अभिनेता करणार दिग्दर्शनात पदार्पण, ‘या’ नाटकाद्वारे नव्या इनिंगला सुरुवात

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actor parth bhalerao directorial debut with his hum dono aur suit play

‘बॉइज’ चित्रपट फेम अभिनेता करणार दिग्दर्शनात पदार्पण, ‘या’ नाटकाद्वारे नव्या इनिगला सुरुवात

‘भूतनाथ रिटर्न्‍स’, ‘किल्ला’ या चित्रपटांतल्या उत्कृष्ट अभिनयामुळे आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारा अभिनेता म्हणजे पार्थ भालेराव. ‘बॉईज’ या चित्रपटातून पार्थला आणखीनच लोकप्रियता मिळाली. आजवर केलेल्या अभिनयाच्या जोरावर पार्थने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते. अशातच आता पार्थ त्याच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. पार्थ हा अभिनेता आता लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Parth Bhalerao On Instagram)

पार्थने स्वत: सोशल मीडियाद्वारे याबद्दलची महिती दिली आहे. पार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या नाटकाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने पार्थ दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणाऱ्या या नाटकात अभिनेत्री रितिका श्रोत्रीची प्रमुख भूमिका असणार आहे. आता या नाटकाची चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

View this post on Instagram

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी त्यांचा अपमान…”, अंकिता लोखंडेच्या आईला रागामध्ये फोन केल्यानंतर विकी जैनच्या आईचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, “त्यांचा कोणत्याही प्रकारे…”

पार्थने त्याच्या पदर्पणाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, “ही कथा आहे १९७०च्या काळातील असून ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते?, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो? हे या नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे.”

आणखी वाचा – आयरा-नूपुरच्या संगीत सोहळ्यात आमिर खानसह पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव व लेक आझादने गायलं गाणं, व्हिडीओ तुफान व्हायरल

तसेच रितिकाने तिच्या भूमिकेबद्दल असे मात्र मांडले आहे की, “यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना १ तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे या भूमिकेसाठी मी उत्सुक आहे.” येत्या १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यामुळे या नाटकासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.  

Tags: entertainemnt newshum dono aur suitmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi play पार्थ भालेरावparth bhaleraoमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीहम दोनो और सूट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Shashank Ketkar Post

"असं काय खास असतं?", ३१ डिसेंबरची गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी पाहता शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला, "समुद्राच्या पाण्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.