शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“असं काय खास असतं?”, ३१ डिसेंबरची गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी पाहता शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला, “समुद्राच्या पाण्यात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 10, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shashank Ketkar Post

"असं काय खास असतं?", ३१ डिसेंबरची गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी पाहता शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला, "समुद्राच्या पाण्यात..."

मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे शशांक घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून त्याच्या विविधांगी भूमिकांमुळे तो प्रेक्षकांचा लाडका बनला. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरंबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. केवळ मराठीमध्ये नाही, तर हिंदी कलाकृतींमधूनही त्याने स्वतःची अशी छाप पाडली. (Shashank Ketkar Post)

सोशल मीडियावरही शशांकचा बर्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. बरेचदा शशांक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपली स्पष्ट मतं मांडत असतो. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये गोव्याच्या कलंगुट समुद्र किनाऱ्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यटकांची तुफान गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “त्यानेच शो जिंकावा”, विकी जैनच्या आईची भलतीच अट, म्हणाली, “अंकिता १६-१७ वर्ष…”

शशांकने हा गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील व्हायरल व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “या रात्री समुद्राच्या पाण्यात अमृत मिळत असेल का? ३१ डिसेंबरला असं काय खास असतं?” असं म्हणत स्टोरी पोस्ट केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. “या व्हिडीओमध्ये मला बीच दिसत नाही आहे, तुम्ही खोटं बोलत आहात” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. “या गर्दीत फिरण्यापेक्षा घरी बसलेलं बरं आहे”, “समुद्रकिनारा कुठे आहे?”, “जत्रा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “मी त्यांचा अपमान…”, अंकिता लोखंडेच्या आईला रागामध्ये फोन केल्यानंतर विकी जैनच्या आईचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, “त्यांचा कोणत्याही प्रकारे…”

यापूर्वी देखील शशांकने अशाप्रकारचे व्हायरल व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलेलं पाहायला मिळालं. अनेक सामाजिक विषयांवर सडेतोड भाष्य करत त्याने आपली मतं मांडली आहेत. शिवाय ट्रोल करणाऱ्या युजर्सनाही त्याने वेळोवेळी प्रतिउत्तर देत धडा शिकवला आहे.

Tags: entertainmentmarathi actorshashank ketkarshashank ketkar on viral videoshashank ketkar post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"त्यांच्यामधील भांडणं…", सासरकडून अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाला होता विरोध, सासूचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "त्या दोघांचं नातं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.