अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगेळे स्थान निर्मण केले आहे. त्यांच्या अभिनयासोबतच ते त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे देखील कायम चर्चेत असतात. चित्रपट, वेबसिरीज अशा सर्व प्रकारच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत आहेत.तसेच त्यांच्या परखड मतांना ही अनेक वेळा प्रेक्षकांची साथ मिळते तर काहींकवेळेला ते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात.(Naseeruddin Shah)
केरला स्टोरी हा चित्रपट सुरवातीपासूनच वादाच्या विळख्यात सापडला आहे.असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगलीच चलती आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल बरीच वक्तव्य केली आहेत. त्यांची चर्चा ही बरीच झाली. आता नसिरुद्दीन शाहांनी देखील या चित्रपटाबद्दल आपले मौन सोडले आहे. केरला स्टोरी बदल बोलताना नसिरुद्दीन शाहांनी निवडणूक आयोगाला देखील टोला लगावला आहे.
पाहा काय म्हणाले नसिरुद्दीन शाह ? (Naseeruddin Shah)
ते म्हणाले, हा एक संपूर्ण प्रचारात्मक चित्रपट आहे, सुशिक्षित लोकांमध्ये ही मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन बनली आहे.सत्ताधारी पक्षाने अतिशय हुशारीने त्याचा वापर केला आहे. आपला देश लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा आहे.मग प्रत्येक गोष्टीत धर्म का आणताय?(Naseeruddin Shah)
हे देखील वाचा : मोठी अपडेट! आकांशा दुबेच्या मृत्यूबाबत खुलासा- अंतर्वस्त्रात सापडले स्पर्म,आरोपींची होणार डीएनए टेस्ट
पुढे ते म्हणले, जर एखाद्या मुस्लिम नेत्याने अललाहू अकबर म्हणत मतं मागितली असती,तर किती मोठा गोंधळ झाला असता, पंतप्रधान मोदी निवडणुकीसाठी धर्माचा वापर करतात, मात्र नुकत्याच झालेल्या,निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. धर्माचा हा वापर लवकर संपेल असं मला वाटत. असं मत अभिनेता नसरुद्दिन शहा यांनी व्यक्त केलं आहे.