Reshma Shinde Wedding : मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बरेच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आता अभिनेत्री पवनसह लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रेश्मा शिंदेच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच नुकतीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात अभिनेत्रीचा शुभविवाह संपन्न झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा व पवन यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे. रेश्मा व पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ, केसात चंद्रकोरचा खूप आणि मोत्यांचे दागिने परिधान करत खास लूक केला. तर रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत नवऱ्या मुलाचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते.
आणखी वाचा – हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर
रेश्माने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. यामध्ये ती पवनसह सप्तपदी घेताना दिसत आहे. शिवाय कानपिळी विधीचा फोटोही तिने शेअर केला आहे. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक शेअर केली.
आणखी वाचा – आईच्या अभिनयाचं लेकाकडून कौतुक, पोस्ट शेअर करत विशाखा सुभेदार भावुक, म्हणाल्या, “त्याच्याकडून ही शाबासकी…”
‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या लग्नापुर्वीच्या फोटोंनीही साऱ्यांचे लक्ष वेधले होते. रेश्माच्या मेहंदी आणि हळदीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला. तर अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटोही चर्चेत राहिले. मालिकाविश्वातील कलाकारांनी मिळून रेश्माच्या केळवणाचा थाट घातला होता.