शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शक्तिमान’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, टीझरही प्रदर्शित, नव्या रुपात बच्चे कंपनींचं मनोरंजन होणार, व्हिडीओ एकदा पाहाच

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Mukesh Khanna shared a special video and hinted that the popular 1990s serial Shaktimaan will come retrun

१९९० च्या दशकातली लोकप्रिय ‘शक्तिमान’ ही मालिका पुन्हा येणार, मुकेश खन्नांनी खास व्हिडीओ शेअर करत दिले संकेत

तुम्हाला दहा वर्षांपूर्वी दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणारी ‘शक्तिमान’ ही मालिका नक्कीच आठवत असेल ना… ‘शक्तिमान’ हा पहिला सुपरहीरो होता जो शत्रुंचा नाश करताना लहान मुलांना एक नवीन संदेश देत होता. याच कारणामुळे ‘शक्तिमान’ लहान मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही विशेष लोकप्रिय झाला होता. १३ सप्टेंबर १९९७ रोजी शक्तिमान या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तब्बल आठ वर्षे ही मालिका यशस्वीरित्या छोट्या पडद्यावर सुरु होती. ‘शक्तिमान’ ही “सुपरहीरो” मालिका दूरदर्शनवरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने ४०० हून अधिक भाग पूर्ण केले. (Mukesh Khanna Shaktimaan Serial Rerun)

आठ वर्षे चाललेली ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेवर सिनेमा येणार किंवा ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा अनेक चर्चा होत होत्या. अनेक वर्षे ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र, ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

आणखी वाचा – Video : भावासाठी रितेश देशमुख प्रचाराच्या रिंगणात, झापूक झुपूक स्टाइलने केलं भाषण, उपस्थितांच्या टाळ्या, शिट्ट्या अन्…

“आता त्याच्या परतीची वेळ आली आहे. आपला पहिला भारतीय सुपर टीचर-सुपरहीरो. आजच्या मुलांवर अंधार आणि वाईट शक्तींचं सावट वाढत चाललं आहे. त्यामुळे ‘शक्तिमान’ परत येत आहे एक संदेश आणि उपदेश घेऊन… आजच्या पिढीसाठी. त्याचं स्वागत करा.” असं म्हणत मुकेश खन्ना यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये ‘शक्तिमान’ त्याच्या स्टाईलनं गोल गोल फिरत येतो. त्याच्या आजूबाजूला भगतसिंग, सुभाषचंद्र बोस या क्रांतिकारकांचे फोटो आहेत.

आणखी वाचा – “१२-१३ वर्षांचा असतानाचा ड्रग्ज घ्यायला लागलो आणि…”, स्मिता पाटील यांच्या लेकाचं मोठं भाष्य, म्हणाला, “कौटुंबिक परिस्थितीमुळे…”

‘शक्तिमान’ ‘टीजरमध्ये ‘आझादी के दिवानों ने जंग लढी’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. लवकरच, ‘शक्तिमान’चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही. ९० च्या दशकात ‘शक्तिमान’ च्या रुपात पहिला सुपरहिरो मिळाला होता. १९९७ ते २००५ या दरम्यान ‘शक्तिमान’ मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. ९० च्या दशकात या मालिकेने लहान मुलांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

Tags: Mukesh Khanna Shaktimaan Serial RerunShaktimaan Fame Mukesh KhannaShaktimaan Serial Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
vivian dsena troll

'बिग बॉस'च्या घरात तंबाखू खातो विवियान डिसेना, दात घाणेरडे असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं, बायको म्हणाली, "ब्रॅण्डचा तंबाखू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.