बाप मुलीचं नातं हे अर्थात नेहमीच खास आणि हळवं असत. या नात्याला असलेला हळुवार स्पर्श हा सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार मंडळींच्या आयुष्यातही जाणवतो. एखादी व्यक्ती सर्वसामान्य असो वा कलाकार बाप हा बापच असतो. मिलिंद गवळी यांनी त्यांची लेक मिथिला हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेलं लोकप्रिय पात्र म्हणजे अनिरुद्ध. मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेसोबतच त्यांनी आजवर बऱ्याच हिंदी मराठी मालिकेत काम केलं आहे. जवळच्या लांबच्या व्यक्तींच्या फोटोंसोबत ते त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर भरभरून लिहीत असतात. शिवाय ते सिनेविश्वात काम करत असताना आलेल्या अनुभवांवरही आपलं मत मांडतात. अशातच मिलिंद गवळी यांच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या जवळची खास व्यक्ती त्यांची लेक मिथिला हिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे.(Milind Gawali Special post)
पाहा लेकीच्या वाढदिवसानिमीत्त काय म्हणाले मिलिंद गवळी (Milind Gawali Special post)
मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मिथिलाचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसरां पेक्षा मोठा सण, तीन जून तारीख म्हणजे आमच्या आयुष्यातला मोठा क्षण, काही दिवस येतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं आयुष्यच बदलून टाकतात, जीवन सुंदर वाटायला लागतं, जगायला एक कारण मिळतं, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो आणि एक छोटीसी परी तुमच्या घरी येते, आणि घरातलं वातावरणच सगळं बदलून जातात, सगळ्यांची सगळी कामं बाजूला राहतात सगळ्यांचे सगळे महत्वाच्या गोष्टी बाजूला ठेवल्या जातात आणि फक्त त्या एका जीवाच्या आजूबाजूला तुमचं जीवन सुरू होतं, तशीच आमच्या आयुष्यामध्ये मिथिला रूपाने एक सुंदरशी परी घरी आली.
हे देखील वाचा – वनिता खरातच कोकणातलं घर तुम्ही पाहिलंत का? हे आहे तिच्या गावाचं नाव
ती हसली की घरातले सगळे हसायचे ,ती रडली की सगळ्यांचे डोळे पाणावायचे, तिला झोप आली की मग सगळ्यांची झोपायची वेळ व्हायची, तिच्या अवतीभवती आमचं जग फिरायचं, आणि सगळ्यात जास्ती आजी आजोबांचं जग ती होती. आणि आजी आजोबांमुळे तिच्यावर खूप सुंदर संस्कार झाले. असं म्हणतात की खूप भाग्यवान असतात ते आई वडील ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात, खरंच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठ पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला मिथिला झाली, आणि मुली कधी आणि कशा मोठ्या होऊन जातात ते आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि एक दिवस एक राजकुमार येतो आणि आपली राजकुमारी त्याच्याबरोबर गगन भरारी घेत भुरकन उडून जातात, मिथिलाला दिग्वीजयची गोड साथ मिळाली.(Milind Gawali Special post)
पण मिथिला आकाशात कितीही उंच उडाली तरी एका घारी सारखी तिची आमच्या वर बारीक नजर सतत असते, आणि वडिलांना तर एक क्षण सुद्धा नजरेआड जाऊ देत नाही. प्रत्येक वाढदिवसाला आपलं बाळ थोडं मोठं झालं असं वाटण्याऐवजी मला ती अजूनही माझं छोटसं बाळ आहे असंच वाटत राहतं. आज वाढदिवसाच्या दिवशी तुला खूप खूप आशीर्वाद, अशीच यशाची शिखरे पार करत रहा, सुखी आनंदी समाधानी रहा, आरोग्याची काळजी घे.
हे देखील वाचा – ‘तू माझ्या पाठीशी आहेस’…पतीच्या वाढदिवसानिमित्त मीनाक्षीशी खास पोस्ट नक्की पाहा
एक वडील म्हणून मिलिंद यांनी त्यांच्या लेकीच्या जन्मापासून आतापर्यंतच्या तिच्या ओढीचे उत्तम वर्णन या पोस्टमध्ये केलं आहे.
