शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वतःची पोळी भाजण्यासाठी…”, प्राजक्ता माळी प्रकरणाचा कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध, म्हणाला, “चारित्र्याचा खून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2024 | 3:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Kushal Badrike publicly condemned the case of Marathi actress Prajakta Mali and he also supported her

प्राजक्ता माळी प्रकरणाचा अभिनेता कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध, पोस्ट शेअर करत दिला जाहीर पाठिंबा

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली. यात प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेत धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी प्राजक्ता माळी भावुकही झाली. प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक मराठी कलाकार तिला पाठिंबा देत आहेत. कलाकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं मत ते मांडत आहेत. (Kushal Badrike supported Prajakta Mali)

या संपूर्ण प्रकरणी आता विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेनेदेखील आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे. कुशल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “जाहीर निषेध” अशी पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टखाली त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने या पोस्टखाली प्राजक्ताला समर्थन देताना असं म्हटलं आहे की, “कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३-४ वेळा परळीला गेलो आहे. काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली. पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र काळजात ‘धस’ होत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?

यापुढे कुशलने असं म्हटलं आहे की, “स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेतसुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध”. त्याचबरोबर या पुढे त्याने “प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे” असं म्हणत तिला आपला पाठींबा दर्शवला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, निर्माते नितीन वैद्य, मुग्धा गोडबले-रानडे यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – “महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा प्राजक्ता माळीला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “काही वाचाळवीरांमुळे…”

तसेच नृत्यांगणा गौतमी पाटीलनेही प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. राज्यातील प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेते यांचा विकृतीकडे प्रवास चालू झाला आहे. महाराष्ट्राने प्राजक्ता माळीसोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे. मला क्षेत्र किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील बदनामी ही पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे, असे म्हणत त्यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे.

Tags: Kushal Badrike supported Prajakta Maliprajakta maliprajakta mali news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru serial update twist that Aditya and Anushka will get married soon promo viral

पारुच्या हातात येणार आदित्य आणि अनुष्काची लग्नपत्रिका, मालिकेत नवा ट्विस्ट, नक्की काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.