‘पारू’ या मालिकेतील आदित्य-पारूची मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते आहे. प्रत्येक वेळी आदित्यवर आलेल्या संकटातून पारू त्याला बाहेर काढताना दिसते आणि आदित्यदेखील पारूला वेळोवेळी मदत करताना दिसतो. अशातच आता दोघांच्या नात्याला नवं वळण येणार आहे. मालिकेत एकामागून एक नवीन वळण येतच असतात. अशातच आणखी एक नवं वळण आलं आहे ते म्हणजे आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचे. मालिकेत लवकरच आदित्य व अनुष्का यांचे लग्न होतानाचे पाहायला मिळणार आहे. (Paaru serial update)
मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली आहे. झी मराठीने ‘पारू’ मालिकेच्या नुकत्याच सहर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये पारू आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाची पत्रिका वाचतानाचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये अहिल्यादेवी, आदित्य व अनुष्का एका देवळात असल्याचे पाहायला मिळत आहे. नंतर पारूही येते. तेव्हा अहिल्यादेवी पारूला एक छोटी पेटी देतात आणि त्यातील एक गोष्ट काढायला सांगतात. ही गोष्ट म्हणजे आदित्य-अनुष्का यांची लग्नपत्रिका.
ही लग्नपत्रिका अहिलयदेवी पारूला वाचायला सांगतात. त्यानंतर पारू “श्रीकृपेने आमचा चिरंजीव आदित्य व चि.सौ.का. अनुष्का यांचा शुभविवाह” असं म्हणत ती लग्नपत्रिका वाचते. यादरम्यान सर्वांचे लक्ष पारूच्या वाचण्याकडे लागून् राहिलेले असते. पत्रिकेतील आदित्य व अनुष्का यांच्या नावामुळे सर्वानाच मोठा धक्का बसतो. अगदी पारू व आदित्यलाही. मालिकेत नुकतंच आदित्यने पारूला प्रेमाची मागणी घातल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता आदित्य व अनुष्का यांच्या लग्नाचा नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू, बेडरुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं असं काय झालं?
त्यामुळे आता पारू मालिकेत नक्की काय होणार? आदित्यचे लग्न नक्की कुणाशी होणार? पारू की अनुष्का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या प्रोमोखाली प्रेक्षकांनी पारू व आदित्य यांचे लग्न व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पारू-आदित्य यांच्या नात्याला काय वेगळं वळण येणार? ही लवकरच पाहायला मिळणार आहे. आदित्यचे अनुष्काबरोबरचे लग्न यशस्वी होणार का? की या सगळ्याला आणखी काही नवं वळण येणार?याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.