जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.न थकता वयाच्या या टप्यावर त्याचं उत्साहाने अण्णांनी काम केलं. नाटक, सिनेमा, मालिका अगदी वेब सिरीज अशा सर्व माध्यमांना त्यांनी आपलंस केलं आणि बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जाबाबदारी त्यांनी शेवटच्या क्षणांपर्यंत पेलली.सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत जयंत सावरकर पाहायला मिळाले.(mangesh desai about jayant sawarakar death)
अनेक कलाकारांनी जयंत सावरकरांसोबतच्या आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली.ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.अनेक कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती, याच दरम्यान अभिनेता मंगेश देसाईंनी मीडिया सोबत सवांद साधला, त्या दरम्यान त्यांनी जयंत सावरकर यांच्या मृत्यूबदल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
पाहा काय म्हणाले मंगेश देसाई? (mangesh desai about jayant sawarakar death)
मंगेश देसाई म्हणाले, वयाच्या या टप्यातही अण्णा ऍक्टिव्ह होते, कायम पथ्यपाणी पाळायचे, आहाराकडे कधी ही दुर्लक्ष न करणारे,दररोज मॉर्निग वॉकला जाणारे,पण एक वडापाव निमित्त ठरला असं म्हणता येईल.१२ तारखेला त्यांनी एक वडा खाल्ला होता, त्याची त्यांना ऍसिडिटी झाली,१३ तारखेला ते जेवले नाहीत, आणि १४, १५ तारखेपासून ते ऍडमिट झाले.

मंगेश देसाई असही म्हणाले, कदाचित अण्णांना कळालं होतं की हे त्यांचे शेवटचे दिवस आहेत,ते असं देखील म्हणाले होते,की बहुतेक माझी पॅकअपची वेळ आली आहे.त्यांच्या कडे बघताना असं कधीही वाटलं नाही की अण्णा आजारी आहेत अनफिट आहेत.या वयातला इतका उत्तम अभिनेता रंगभूमीवरून जाण हे रंगभूमीला पोकळी निर्माण करणार आहे.असं म्हणत मंगेश देसाईंनी जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.(mangesh desai about jayant sawarakar death)
हे देखील वाचा : “मी सतत सांगितलं अण्णा तुम्ही झोपा पण..” जयंत सावरकरांसाठीची समीर चौंघुलेंची पोस्ट चर्चेत