काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झाले. ज्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला, त्यावरून त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवस आधीच झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला, रवींद्र महाजनी पुण्यात एकटेच राहायचे, या सर्व मुद्यांवरून रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी मोठ्या प्रमणावर ट्रोल होताना पाहायला मिळाला. (gashmeer mahajani struggle story)
यादरम्यान, मुलगा एवढा मोठा अभिनेता असताना देखील वडिलांची अशी अवस्था का झाली? ते एकटे का राहत होते? यांसारखे अनेक प्रश्न गश्मीरला विचारण्यात आले, गश्मीर आणि त्याच्या आईचे रवींद्र महाजनी यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील अनेक प्रश्न निर्माण झाले. या मुद्यांवरून गश्मीर गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना पाहायला मिळाला.शेवटी गश्मीरने देखील मौन सोडून, ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते, आम्ही त्यांना जास्त ओळखतो असं म्हणत तात्पुरतं नेटकऱ्यांना उत्तर दिले.
जाणून घ्या गश्मीरची स्ट्रगल स्टोरी (gashmeer mahajani struggle story)
याच पार्श्ववभूमीवर गश्मीरचे वडीलां सोबत चांगले संबंध नसल्याच्या चर्चांना उधाण आले.रवींद्र महाजनी यांच्या मुळेच आज गश्मीर अभिनेता होऊ शकला असं मत देखील अनेकांनी व्यक्त केलं, पंरतु पडद्यामागे प्रत्येकाचा स्ट्रगल असतो.गश्मीरने त्याच्या या स्ट्रगलबाबत सांगितले आहे.गश्मीरचं त्याच्या आईवर विशेष प्रेम आहे.गश्मीर १५ वर्षांचा असताना त्याच घर गहाण होतं, ४०-५० लाखाचं कर्ज त्याच्या खांद्यावर होतं.आई गृहिणी होती.तेव्हा वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी गश्मीरने स्वतःची डान्स अकॅडेमी सुरु केली.(gashmeer mahajani struggle story)
त्यांनतर दोनच वर्षांनी म्हणजे १७ व्या वर्षी गश्मीरने त्याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली.इतक्या लहान वयातही गश्मीरने ती कंपनी यशस्वीरीत्या सांभाळली, आणि वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे ६ वर्षांमध्येच गश्मीरने ते ४०-५० लाखांचं कर्ज फेडलं आणि गहाण असलेलं घर सोडवलं.त्यानंतर गश्मीर हे देखील म्हणाला,तो एकमेव असा होता,जो १७ व्या वर्षी आईच्या नावाने इनकम टॅक्स रिटन फाईल करायचा,१८ व्या वर्षी पासून त्याने स्वतःच्या नावाने इनकम टॅक्स रिटन फाईल करायला सुरुवात केली.त्याच्या तेव्हाच्या या निर्णयांमुळे आणि कष्टांमुळे त्याची अभिनयाची आवड त्याला जोपासता आली आणि अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली.
हे देखील वाचा: ‘वडापाव’ ठरला जयंत सावरकरांच्या मृत्यूचं कारण, मंगेश देसाईंनी केला खुलासा