मालिका विश्वात फार कमी वेळा असं घडत कि नायक नायिका यांच्यासोबतच खलनायक सुद्धा तेवढेच लोकप्रिय होतात. लोकप्रिय खलनायकांपैकी एक प्रसिद्ध नायक ठरलेला हृषीकेश शेलार ने नुकतीच त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका सुंदर घटनेची माहिती प्रेक्षकांना सोबत शेअर केली आहे.(Hrishikesh Shelar Daughter Name)
काही दिवसांपूर्वी हृषीकेश ने त्याला मुलगी झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. हृषीकेशच्या मुलीचं नाव काय असणार या बद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता संपली असून नुकताच हृषीकेशच्या मुलीचं बारसं पार पडलं असून ‘रुही’ असं त्याच्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं आहे.हृषीकेश ने ही आनंदाची बातमी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. बारश्याचे काही फोटोस शेअर केले आहेत.

हृषीकेश आणि रुहीचे फोटो प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

हृषीकेश ने त्याच्या अकॉउंट वरून रुही चेही फोटो शेअर केले आहेत.

हृषीकेश आणि त्याची मुलगी रुही(Hrishikesh Shelar Daughter Name)

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील दौलत या पात्र नंतर रीषीकेश आता झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसत आहे.