Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानची मुलगी इरा खान व नुपूर शिखरे यांचा शाही विवाहसोहळा येत्या १० जानेवारीला उदयपूर येथे पार पडणार आहे.जवळच्या नातेवाईक, कुटुंबियांसह खान कुटुंब उदयपूरला रवाना झाले आहेत. सोमवार ८ जानेवारी रोजी इरा व नुपूर यांचा शाही मेहंदी सोहळा पार पडला. आमिर खानच्या लेकीच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. या समारंभानंतर आयरा व नुपूरच्या ‘पजामा पार्टी’च्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
समोर आलेल्या पजामा पार्टीच्या व्हिडीओमध्ये स्वतः नवरी मुलगी स्टेजवर गाणं गाताना दिसत आहे. या खास पार्टीसाठी नववधूवराचा लूक लक्षवेधी ठरत आहे. यावेळी आयराने चमकदार पायजमा व त्यावर शर्ट परिधान केलेलं पाहायला मिळालं. तर नुपूरचा या पजामा पार्टीसाठीचा लूक खास भाव खाऊन गेला. नुपूरने या पार्टीसाठी निळ्या रंगाची लुंगी व पांढरा शर्ट परिधान केला होता. आयरा व नुपूर यांनी त्यांच्या भव्य लग्नाचे उदयपूर येथे आयोजन केले असून लग्नापूर्वी आयोजित केलेल्या ‘पजामा पार्टी’च्या व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
यावेळी यो यो हनी सिंगचा लुंगी डान्स करत निळी लुंगी व पांढरा शर्ट घालून नुपूरने या पार्टीत प्रवेश केला. चेन्नई एक्सप्रेसमधील शाहरुख खानच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरलेला पाहायला मिळाला. आयराच्या लग्नसाठी आमिर खान तसेच त्याची माजी पत्नी रीना दत्ता, किरण राव उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. याशिवाय आमिर खानचा मुलगा जुनैद खान, व आझादही बहिणीच्या लग्नात एन्जॉय करताना दिसत आहेत. अलीकडेच उदयपूरमध्ये लग्नाआधीच्या एका कार्यक्रमात किरण राव गाणं गातानाचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये आझाद त्याच्या आईच्या शेजारी पाहायला मिळाला.
८ जानेवारीला आयरा व नुपूर यांचा मेहंदी समारंभ उरकला. मेहंदी समारंभातीलही आयरा व नुपूरचा लूक लक्षवेधी ठरला. आयराने व नुपूरने मेहंदी सोहळ्यात मित्र परिवारासह ठेका धरत धमाल मस्ती केलेली पाहायला मिळाली.