महेश कोठारे हे नाव घेतलं की दिग्दर्शन हे आलंच. मात्र दिग्दर्शनाआधी त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. अभिनयापासून त्यांनी सिनेसृष्टीतील आपला प्रवास सुरु केला. महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचा देखील सिनेविश्वात चांगलाच दबदबा होता. त्यांच्या ओळखीतूनच महेश कोठारे यांचा बालकलाकार म्हणून प्रवास सुरु झाला. छोटा जवान या सिनेमासाठी महेश कोठारे यांच्या वडिलांनी कोणताही शब्द न टाकता त्यांचं या चित्रपटासाठी सिलेक्शन झालं. महेश कोठारे यांच्या छोटा जवान या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. (Mahesh Kothare Incidence)
या चित्रपटातून महेश कोठारे यांनी योगायोगाने मिळालेल्या संधीच सोन देखील केलं, मात्र चित्रपटाच्या प्रदर्शना दरम्यान त्यांच्यावर अन्याय झाला असं अंबर कोठारे यांनी म्हणून दाखवलं, आणि आज कधीही छोटा जवान ची आठवण आली की महेश कोठारे यांना देखील वडिलांचं म्हणणं योग्य वाटत. याबाबतचा किस्सा महेश कोठारे यांनी त्यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकात सांगितला आहे.
पाहा महेश कोठारे यांच्यावर काय झालेला अन्याय (Mahesh Kothare Incidence)
याबाबत बोलताना महेश यांनी म्हटलंय, की हा चित्रपट पूर्ण होऊन शेवटी प्रदर्शनाचा दिवस उजाडला. हा चित्रपट ‘गिरगावच्या ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटगृहात ‘छोटा जवान’चा दणक्यात ‘प्रीमियर शो देखील झाला. राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुलोचनादीदी या ‘शो’ला उपस्थित होते आणि त्यांच्या बाजूला बसण्याचं भाग्य मला लाभलं होतं. या चित्रपटातील माझी ती चाल आणि त्यामागचं पार्श्वसंगीत पु लं यांना खूप आवडलं होतं. ‘काय काम केलंयस तू! कमाल केलीस तू!’ हे पुलंचे त्यावेळचे उद्गार होते. श्री. बाळासाहेब देसाई यांनीही माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. (Mahesh Kothare Incidence)
या चित्रपटात माझी शीर्षक व्यक्तिरेखा असल्यामुळे पहिल्याच दिवशी आम्ही ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहाला भेट दिली होती. परंतु या चित्रपटाचं पोस्टर पाहून माझे डॅडी खूपच नाराज झाले होते; कारण माझी मुख्य भूमिका असूनही पोस्टरवर मला कुठंतरी कोपऱ्यात स्थान देण्यात आलं होतं. जयराज, सुलोचनादीदी, गजानन जागीरदार यांच्या व्यक्तिरेखेची छायाचित्रं पोस्टरवर होती. मला मात्र चित्रपटाच्या पोस्टरवरील एका कोपऱ्यात ठेवण्यात आलं होतं. मी तेव्हा लहान असल्यामुळे कदाचित नाराज झालो नसेन; परंतु आज जेव्हा मी भूतकाळातील या घटनेचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं, की पोस्टरवर मला ठळकपणे स्थान न देणं ही किती मोठी चूक होती.(Mahesh Kothare Incidence)
हे देखील वाचा – बँकेत नोकरी करताना इतक्या पैशात अशोक मामा काढायचे महिना
ही व्यक्तिरेखा मी साकारली म्हणून माझी नाराजी नव्हती, तर मुख्य व्यक्तिरेखेला योग्य पद्धतीनं ‘प्रमोट’ करायला हवं होतं. ते या चित्रपटात झालं नव्हतं. महेश कोठारेंना आजही याबाबत आठवलं की, त्यांना त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला असं वाटत. आज महेश कोठारे खूप मोठे दिग्दर्शक म्हणूनसिनेसृष्टीत ताठ मानेने वावरत आहेत, मात्र आज कधीही त्यांना हा किस्सा आठवला तरी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं वाईट वाटत.