राजकारण आणि कलाकार यांचं फार जून समीकरण आहे असं सांगितलं जात. हल्ली मनोरंजन विश्वातील अनेक चित्रपटांच्या ट्रेलर लाँचला दिसणारी अनेक राजकारणी मंडळी आणि अनेक मनोरंजन विषयक कार्यक्रमांना असणारी यांची हजेरी हे सगळं आधीपासून चालत आलेलं आहे. एका राजकारणी व्यक्तीमुळे लाईव्ह झालेला सोहळा बदल करून रात्री २ वाजता पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामुळे मराठी कलाकारांचा स्वाभिमान जपण्यास मदत झाली. हा किस्सा आहे अभिनेते महेश कोठारे आणि हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे यांचा.(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)
महेश कोठारे यांनी सांगितलं एका स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात त्यांना माझा छकुला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिगदर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे दोन पुरस्कार देण्यात आले आणि हा संपूर्ण सोहळा लाईव्ह दाखवण्यात येत होत. सोहळा संपवून ते घरी आले आणि घरच्यांना विचारलं पुरस्कार दिल्याचं पाहिलात का तेव्हा घरच्यांनी नाही रे ते दाखवलंच नाही असं महेश याना सांगितलं. तेव्हा महेश कोठारे यांच्या लक्षात आलं कि मराठी पुरस्काराचा बतो भाग दाखवण्यातच आला नाही आणि महेश या वर भलतेच संतापले.
मराठी चित्रपटांच्या मागे खंबीर उभे बाळासाहेब(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)
मराठी चित्रपटांची होणारी गळचेप पाहून हे थांबवण्यासाठी महेश यांनी थेट मातोश्री वर बाळासाहेब यांना फोन लावला. महेश यांना समोरून बोल महेश काय म्हणतोस असा प्रश्न आला आणि महेश कोठारे यांनी घडलेला सर्व प्रकार बाळासाहेबांना सांगितला. सगळं ऐकून घेतल्यानंतर ‘काय सांगतोस महेश, थांब मी बघतोच आता’ असं बोलून बाळासाहेबांनी फोन ठेवला. हा स्वर बाळासाहेबांच्या मुखातून महेश कोठारे यांनी ऐकला आणि आता यावर नक्की काहीतरी उपाय होईल याची खात्री महेश यांना मिळाली.(Mahesh Kothare Balasaheb Thackeray)
हे देखील वाचा – ‘मराठी चित्रपट न चालण्यासाठी ही कारणं आहेत….’न चालणारे मराठी चित्रपट आणि लक्ष्या ने मांडलं होत परखड मत
संभाषण झाल्यानंतर महेश कोठारे यांना वाटलं बाळासाहेब सकाळ यावर लक्ष देतील. पण पुढे महेश कोठारे यांनी टीव्ही वर पाहिलं तर मराठी पुरस्काराचा तो भाग जोडून पुन्हा तो कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आला. रात्री दोन वाजता अवघ्या १० मिनिटात बाळासाहेबांच्या एका फोनमुळे मराठी चित्रपटांचा सन्मान पुन्हा मिळाला असं देखील पुढे महेश कोठारे यांनी सांगितलं. महेश कोठारे यांचा हा प्रसंग मराठी चित्रपट सृष्टी बहारदार बनवण्यात कलाकारांच्या कलेसोबतच कला जपणारे आणि बाळासाहेबांसारखे रसिक प्रेक्षक ही असणं गरजेचं असत.