सध्या लग्नकार्याची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत होती. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे लग्नबंधात अडकला. अचानक दत्तूने त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. दत्तूच्या लग्नाच्या बातमीने सर्वांच धक्का बसला. सुरुवातीला दत्तूच्या आणि स्वातीच्या प्री वेडिंग फोटोशूटचे फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली. त्यानंतर सार्यांना दत्तूच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. त्यांनतर दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वातीसोबत लगीनगाठ बांधली.(Dattu Mores Honeymoon)
दत्तूच्या लग्नसोहळ्याची अचानक बातमी समोर आल्याने दत्तू मोरेच केळवण करायचं राहून गेलं. इट्स मज्जाच्या केळवण स्पेशल या सेगमेंटमध्ये दत्तूच केळवण करण्यात आलं. पोस्ट मॅरीज केळवणाला दत्तूने पत्नीसोबत हजेरी लावली होती. दत्तूच लग्न खूप झटापटीने झालं त्यामुळे दत्तूला लग्नाआधी केळवण झालं की नाही, असा प्रश्न विचारला असता दत्तू म्हणाला की, केळवणाला वेळ मिळालाच नाही, हे माझं पहिलं केळवण असावं.
पहा कुठे जाणार दत्तू मोरे हनिमूनला (Dattu Mores Honeymoon)
लग्न संभारंभ, प्री वेडिंग फोटोशूट उरकल्यानंतर आता दत्तू त्याच्या बायकोला घेऊन कुठे हनिमूनला जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. इट्स मज्जाच्या मुलाखतीत दत्तूने हनिमूनला कुठे जाणार याबाबत खुलासा केला आहे. फिरायला कुठे जाणार असा प्रश्न विचारला असता, दत्तू मोरे काय म्हणाला, आम्ही फिरायला बाली येथे जाणार आहोत.(Dattu Mores Honeymoon)
हे देखील वाचा – ‘रात्री १ वाजल्यापासून रांगेत…’ म्हणत अमृताने शेअर केला आईसोबत उज्जैन दर्शनचा अनुभव
या शिवाय फिरायला जाण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता असा प्रश्न जेव्हा दत्तू आणि त्याच्या पत्नीला केला तेव्हा दत्तू आणि त्याची पत्नी दोघे म्हणाले की, बाली ला फिरायला जाण्याचा निर्णय हा आम्हा दोघांचा होता. दत्तू आणि त्याची पत्नी स्वाती हनिमूनला बाली येथे जाणार आहेत हे समोर आलंय.
