सध्या राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याने ‘बिग बॉस १२’ फेम सोनी खानसह गुपचूप लग्न केले आहे. त्यानंतरच्या या जोडप्याने थेट सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी गुडन्यूज केली. सध्या आदिल खान व सोमी खानच्या लगाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या हे फोटो चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. काही काळापूर्वी दोघांनी दुबईत एक म्युझिक व्हिडीओ शूट केला होता, तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. (Adil Khan Durrani wedding)
आदिल खानने म्हैसूरमध्ये सोमी खानसह लग्न केले, या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. आता आदिल व सोमीचा लग्नानंतरचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आदिल व सोमी त्यांच्या पहिल्या जुम्माचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
तसेच सोमीची बहीण सबा खानने देखील या जोडप्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती दोघांची प्रशंसा करत म्हणत आहे की, “हे खूप सुंदर जोडपं आहे आणि असे जोडपे यापूर्वी कधीही पाहिले नाही. दोघेही असेच आनंदी रहावेत अशी प्रार्थना करते”, असं सबाने म्हटलं. यानंतर सबाने कॅमेरा आदिल व सोमीकडे वळवला तेव्हा दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसले. त्यावेळी आदिल आनंदाने म्हणतो, “अखेर लग्न झालं, मी या जगातील सर्वात सुंदर राजकुमारीशी लग्न केलं आहे”.
आदिलचे सोमीबद्दलचे हे शब्द ऐकून लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, “आदिलने राखीसाठी या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या”. तर दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, “आता राखीच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय”. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, “पहिली राखी जगातील सुंदर स्त्री होती आता ही आहे”, असं म्हणत त्याला टोकलं आहे.