आयआरएस ऑफिसर समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरला अज्ञात इसमाकडून जिवेमारण्याची धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे. याबाबतीत स्वतः क्रांतीने फोटो शेअर करत माहिती दिली आहे. क्रांतीने तिच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरुन काही फोटो शेअर केले आहेत. क्रांतीने हे फोटो पोस्ट करत “गेल्या वर्षभरापासून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. माझ्या मोबाईल वर पाकिस्थानी, UK तील वेगवेगळ्या नंबरवरुन या धमक्या येत आहेत. मी वारंवार याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. तरी यावर योग्य ती कारवाई व्हावी”(Kranti Redkar Get Death Threats From Pakistan)
क्रांतीने याबाबत गोरेगाव पोलीस चौकीत तक्रार देखील नोंदवली आहे. क्रांतीने पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस यांना देखील टॅग करत मदतीचे आवाहन केले आहे. क्रांतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही मोबाईल नंबर देखील दिसत आहेत. जीवे मारण्याच्या धमक्यांसह अश्लील मेसेजेस देखील येत असल्याची माहिती क्रांतीने दिली आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @mumbaipolice I have been receiving death threats on my mobile number from various Pakistani numbers and a number from the Uk. Just wanted to bring it to your kind notice ???? This has been happening since last one year. The police… pic.twitter.com/pdgytGCYRp
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) March 8, 2024
अभिनया व्यतिरिक्त क्रांती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. समीर वानखेडे व लेकींसह क्रांती अनेक रिल्स शेअर करताना पाहायला मिळते. क्रांतीच्या या रिल्सला चाहत्यांचा देखील चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. क्रांती-समीर अभिनय आई त्यांच्या काम व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात समाजसेवा देखील करताना दिसतात. क्रांतीने अनेक मारही चित्रपटांमध्ये अभिनय साकारुन प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे तर क्रांतीने काही चित्रपटांच्या निर्मितीची धुरा देखील सांभाळली आहे. (Kranti Redkar Get Death Threats From Pakistan)
क्रांतिने बाबत घडलेल्या या घटनेकडे सरकार कशाप्रकारे लक्ष देणार याकडे क्रांतीसह चाहत्यांच देखील लक्ष लागून राहिलं आहे. क्रांतीने पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि मुंबई पोलिस यांना मदतीचे आवाहन करत या तक्रारीवर मार्ग काढावा अशी विनंती केली आहे.