वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळ ही लाईन प्रत्येकानेच ऐकली असेल. अभिनयाचं चालत बोलतं विध्यापीठ अशी ख्याती असलेले आणि या गाण्याचे निर्माते, लेखक म्हणजेच दादा कोंडके. अनेक विनोदी चित्रपट, लोकनाट्य रचत दादांनी मनोरंजन सृष्टी बहारदार बनवली. सेन्सॉर बोर्डला देखील डोकं फोडायला लावणारे दादा कोंडके ओळखले जायचे त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाच्या नावासाठी. तर चित्रपटातील गाणी हे दादांच्या चित्रपटांच्या यशाचा एक अमूलाग्र भाग असायची याचं गाण्यांमधलं एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणजे ‘ढगाला लागली कळं’.(Dada Kondke Songs Songadya)
कोणतंही गाणं फेमस होण्यामागे महत्वाचे असतात ते त्याचे शब्द आणि ढगाला लागली कळं या गाण्याचे बोल दादांना सुचले कसे याबद्दल स्वतः दादा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे. सोंगाड्या तुफान गाजला त्यामागे एक कारण होतं हे गाणं आणि हे गाणं दादांना सुचलं होतं राधानगरीच्या जंगलात. दादा त्यांच्या मित्रांसोबत शिकारीला गेले होते. रात्रभर दादांनी आणि त्यांच्या सवंगड्यानी भटकूनही त्यांना शिकार मिळाली नाही त्यामुळे एका झाडाखाली सगळे विसावा घ्यायला थांबले.

पहाटेची वेळ होती आणि त्यात थंडी त्यामुळे दादांनी त्यापासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली. त्याचवेळी दादांना आभाळात एकच काळा ढग दादांना दिसला आणि त्यातून हलकीशी थेंबगळ सुरु झाली आणि दादांना मुखडा सुचला ‘ वर ढगाला लागलीये कळ, पाणी थेंब थेंब गळ’. शिकारीवरून परत आल्यावर दादांनी पूर्ण गाणं लिहून काढलं.
यावरून समजत कि दादा कोंडके हे केवळ विनोदवीर नसून किती उत्तम कवी होते याची प्रचिती येते.(Dada Kondke Songs Songadya)