आजच्या या धकाधकीच्या जीवनात पाहायला गेलं तर मनोरंजन हे विरंगुळेच एक उत्तम साधन आहे. प्रेक्षकवर्ग हा याच मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांसाठी वेडा असतो. प्रेक्षकांना कलाकारांचा अभिनय, त्याच सादरीकरण, तसेच ती व्यक्ती देखील आवडू लागते. (Ashok saraf At Airport)
असाच संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कलाकार म्हणून अभिनेते अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जात. अशोक सराफ यांच्या अभिनयाचे, त्याच्या अचूक विनोदी टायमिंगचे लाखो चाहते आहेत. एक काळ अशोक सराफ यांनी चांगलाच गाजवला होता. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अशोक मामांचे भरपूर चाहते आहेत.
पाहा अशोक मामा पापराजींसोबत काय बोलले (Ashok saraf At Airport)
नुकतेच मामा एअरपोर्ट वर दिसले होते. दरम्यान त्यांनी पापाराझींसोबत संवाद देखील साधला. अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी एकत्र एअरपोर्ट वर दिसली होती. त्यावेळी अशोक मामांनी पापराजींसोबत संवाद साधला. चला तर पाहूया नेमकं काय म्हणाले अशोक सराफ.(Ashok saraf At Airport)
हे देखील वाचा – निवेदिता आणि अशोक सराफ यांचा परदेश दौरा
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे परदेश दौरा करण्यास निघाले आहेत. निवेदिता सराफ यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ एअरपोर्टवरीलच आहे.
निवेदिता यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधून हे कळतंय की, त्या व्हॅक्युम क्लिनर या नाटकाच्या प्रयोगाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात गेल्या आहेत.
सिडनी आणि मेलबर्न येथे होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगासाठी व्हॅक्युम क्लिनरची संपूर्ण टीम निघाली आहे. या व्हिडिओमध्ये निवेदिता सराफ यांच्यासोबत अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकाची इतर टीम पाहायला मिळतेय.
