गुरूवार, एप्रिल 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाहत्यांचं बोलणं ऐकून मामांनी सोडला ‘थर्ड क्लास’ चा प्रवास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2023 | 1:25 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf Incidence

Ashok Saraf Incidence

अशोक सराफ हे नाव घेतलं की त्यांचा आतापर्यंतचा सिनेविश्वातील प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी आजही सिनेविश्वात काम करण्याची ओढ त्यांची कुठेही कमी झालेली जाणवत नाही. एक काळ मराठी सिनेविश्वात गाजवलेल्या या नटाला कोण ओळखणार नाही असं होणं शक्यच नाही. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही अशोक सराफ यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीमधील अनेक किस्से आजवर आपण ऐकलेत, वाचलेत. कधी हे किस्से मनोरंजन करण्यास तत्पर असतात तर कधी या किस्स्यांमधुन बरच काही शिकण्यासारखंही असत. अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे.(Ashok Saraf Incidence)

कोल्हापूरला शूटिंग असलं की अशोक मामा नेहमीच ट्रेनने प्रवास करत. ज्यावेळी त्यांनी निर्मात्यांना तिकीट काढायला सांगितलं तेव्हा ते म्हणाले होते, कशाला उगाच माझं फर्स्टक्लासचं तिकीट काढतोस, मला चालेल थ्री टियर. एरवी मी टू टियरनं जातो, पण यावेळी थ्री टियरमध्ये कॅमेरामन वगैरे बाकीचा सगळा स्टाफ होता. मनात म्हटलं, त्यांच्याशी गप्पा मारत जाऊ.

पहा का केला मामांनी ट्रेनचा प्रवास बंद (Ashok Saraf Incidence)

रात्री आठ वाजता सीएसटी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसनं अशोक मामा निघाले होते. या दरम्यानचा एक किस्सा सांगत मामा म्हणाले, एरवी एकटा असलो की गाडीनं स्टेशन सोडल्यावर मी झोपायच्या तयारीला लागायचो. माझी तेव्हाची ही नेहमीची सवय. कोल्हापूरला जायचं असलं की या गाडीत बसायचं, मस्तपैकी ताणून द्यायच आणि सकाळी सात वगैरे वाजता कोल्हापूर स्टेशन आलं की उठायचं. त्या दिवशी सोबत असल्यामुळे आमच्या गप्पा सुरू झाल्या.(Ashok Saraf Incidence)

गाडी सुटून पंधरा-वीस मिनिटं झाल्यावर समोरच्या बाकावर बसलेल्या आणि आमच्या गप्पा ऐकणाऱ्या दोघा मित्रांपैकी एकाची चुळबूळ अशोक मामांच्या लक्षात आली. तेव्हा धीर करून त्यानं मामांकडे पाहत म्हटलं, ‘नमस्कार.’ मामांनीही त्याला नमस्कार केला. लगेच तो खिडकीच्या बाजूला बसलेल्या आपल्या दुसऱ्या मित्राकडे पाहून म्हणाला, ‘ओळखलंस का यांना? अशोक सराफ…’ यावर तो उत्तरला, ‘मी यांना केव्हाच ओळखलं होतं. पण मला वाटलं नव्हतं की हे थर्ड क्लासनं प्रवास करत असतील.”

हे देखील वाचा – तिला विचारल्याशिवाय मी निर्णय घेत नाही,पण निवेदिता…- अशोक मामांनी सांगितला सुखी संसारच मंत्र

तेव्हा मामा पुढे म्हणाले, मला त्या रात्री काही शांत झोप लागली नाही. च्यायला, या माणसानं आपला पार कचरा करून टाकला असं सारखं मनात येत होतं. सकाळी कोल्हापूर स्टेशनवर उतरलो तेव्हाच यापुढे पुन्हा सेकंड क्लासनं जायचं नाही असा निर्णय घेऊन टाकला. मामांचा थोडासा मिश्किल स्वभाव असल्याने त्या व्यक्तीच बोलणं मामांना चांगलंच लागलं, शिवाय त्यांचं सिनेसृष्टीत ही नाव मोठं झालं होत आणि म्हणूनच त्यांनी यापुढे तृतीय श्रेणीमधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला.

Tags: ashok mamaashok sarafashok saraf moviesentertainmentits majjamarathi actormarathi movietrain travel
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aditi Dravid struggle
Entertainment

“मागचं वर्ष मेंटल हेल्थ फेजमध्ये होते”, अदिती द्रविडचा कठीण काळ, म्हणाली, “मी कधी बोलले नाही…”

एप्रिल 9, 2026 | 1:15 pm
Samay Raina on Controversy
Entertainment

“स्वतःच्या मुलाला पायावर उभं का नाही केलं?”, कॉमेडियनचा थेट अमिताभ बच्चनला सवाल, रोस्ट करणं पडणार महागात?

एप्रिल 9, 2026 | 10:40 am
deeksha pawar akanksha choudhary fight
Entertainment

एकमेकींचे कपडे फाडले, मारामारी केली अन्…; लोकप्रिय रिऍलिटी शोमध्ये नेमकं सुरुय काय?, नॅशनल टीव्हीवर हा प्रकार पाहून संताप

एप्रिल 9, 2026 | 9:44 am
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande
Entertainment

Video : पत्नीकडून औक्षण, केक कटिंग अन्…; ‘बिग बॉस ६’ मधून घरी परतताच सागर कारंडेचं कुटुंबियांकडून कौतुक, भावुक झाला आणि…

एप्रिल 8, 2026 | 5:35 pm
Next Post
Adipursh Trailer Launch

बहुचर्चित आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर होतोय व्हायरल,सैफली खानचा लुक चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.